Share

भारत सेक्युलर देश आहे,आज लोकशाहीचा पराभव झाला;ओवेसींचा जळफळाट

Published On: 

नवी दिल्ली- राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडला आहे. नरेंद्र मोदी यांनी यावेळी पर्णकुटीत राहणाऱ्या रामलल्लाचे भव्य मंदिर उभे राहणार असल्याचे सांगितले. नरेंद्र मोदी यांनी भूमिपूजनानंतर उपस्थितांना संबोधित केले. नरेंद्र मोदींनी मला निमंत्रण देत या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचा मान दिल्याबद्दल विश्वस्त मंडळाचे आभार मानले.

यावेळी मोदींच्या हस्ते राम मंदिराच्या टपाल तिकीटाचेही अनावरण करण्यात आले. आज संपूर्ण जगभरात प्रभू रामाचा जयघोष होत असल्याचे सांगत मोदींनी सर्व देशवासी आणि जगभरात असलेल्या भारतभक्त आणि रामभक्तांना शुभेच्छा दिल्या. तर दुसऱ्या बाजूला मोदींच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन झाल्यानंतर एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांचा जळफळाट पाहायला मिळत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराचे भूमिपूजन करून पद स्वीकारताना घेतलेल्या शपथेचं उल्लंघन केलं आहे, आजचा दिवस हा लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेच्या पराभवाचा आणि हिंदुत्वाच्या विजयाचा दिवस आहे, असे ओवेसींनी म्हटले आहे.

पंतप्रधानांच्या हस्ते राम मंदिराच्या भूमिपूजनाला विरोध करणाऱ्या असदुद्दीन ओवेसींनी भूमिपूजन सोहळा पार पडल्यानंतर आपला संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, भारत हा एक सेक्युलर देश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराचे भूमिपूजन करून पद स्वीकारताना घेतलेल्या शपथेचं उल्लंघन केलं आहे, आजचा दिवस हा लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेच्या पराभवाचा आणि हिंदुत्वाच्या विजयाचा दिवस आहे.

महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –

अस्तित्व मिटवण्याचे अनेक प्रयत्न झाले, पण राम आपल्या सगळ्यांच्या मनात!: पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंढरपूर : हिंदू-मुस्लिम बांधवांनी केली श्रीरामाची आरती;सामाजिक ऐक्याचा दिला संदेश

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!