नवी दिल्ली – राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडला आहे. नरेंद्र मोदी यांनी यावेळी पर्णकुटीत राहणाऱ्या रामलल्लाचे भव्य मंदिर उभे राहणार असल्याचे सांगितले. नरेंद्र मोदी यांनी भूमिपूजनानंतर उपस्थितांना संबोधित केले. नरेंद्र मोदींनी मला निमंत्रण देत या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचा मान दिल्याबद्दल विश्वस्त मंडळाचे आभार मानले.
यावेळी मोदींच्या हस्ते राम मंदिराच्या टपाल तिकीटाचेही अनावरण करण्यात आले. आज संपूर्ण जगभरात प्रभू रामाचा जयघोष होत असल्याचे सांगत मोदींनी सर्व देशवासी आणि जगभरात असलेल्या भारतभक्त आणि रामभक्तांना शुभेच्छा दिल्या.दरम्यान, या सोहळ्याच्या निमित्ताने देशवासियांना संबोधित करताना नरेंद्र मोदी म्हणाले, आज संपूर्ण भारत राममय आहे. सारा देश रोमांचित आहे. मन दीपमय आहे. देश भावुक झाला आहे. अनेक वर्षांची प्रतीक्षा आज संपली. कोट्यवधी लोकांचा कदाचित आजच्या दिवसावर विश्वास बसणार नाही की त्यांच्या हयातीत त्यांना आजचा हा दिवस दिसला.
दरम्यान, या सोहळ्याच्या निमित्ताने अनेक मंडळी आपल्या भावना व्यक्त करीत आहेत. माजी क्रिकेटर मोहम्मद कैफने एक ट्वीट केले असून त्याची खूप चर्चा सुरु आहे. आपल्या स्वातंत्र्यलढ्याच्या वेळी अनेकांनी आपण सगळं काही समर्पित केला.आंदोलन झालं नाही असा एकही दिवस नव्हता. स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलं नाही असा देशात एक भूभाग नसेल. 15 ऑगस्टचा दिवस जसा त्या बलिदानांचं प्रतीक आहे. तसा राममंदिरासाठी वर्षानुवर्षं अनेक पिढ्यांनी अविरत एकनिष्ठपणे प्रयत्न केले. मी 120 कोटी देशवासीयांच्या वतीने मस्तक नमवून वंदन करतो, असंही यावेळी त्यांनी सांगितलं.
Growing up in Allahabad,a city with Ganga-Jamuna culture,I loved watching Ramlila-a tale of compassion,co-exsistence,honour and dignity.Lord Ram saw goodness in everyone and our conduct should reflect his legacy.Don’t allow the agents of hate to come in the way of love and unity.
— Mohammad Kaif (@MohammadKaif) August 5, 2020
दरम्यान, भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफच्या ट्विटची. मोहम्मद कैफच्या या ट्विटनं सगळ्यांचं मन जिंकलं आहे.राममंदिराच्या भूमिपूजनानंतर मोहम्मद कैफनं ट्वीट करत, “मी अलाहाबादमध्ये मोठा झालो. गंगा-जमूनेच्या संस्कृतीत रामलीला पाहणे मला कायम आवडायचे. रामलीलातून मला दया, मोठेपणा आणि अस्तित्व यांची शिकवण मिळाली. भगवान श्री राम यांनी कायम इतरांचा चांगुलपणा पाहिला. त्यामुळे प्रेम आणि ऐक्याच्या मार्गात द्वेष पसरवणाऱ्यांना थारा देऊ नका”, असे मत व्यक्त केले.
महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –
राम मंदिरामुळे देशात ‘रामराज्य’ स्थापित होईल – रामदेव बाबा
अस्तित्व मिटवण्याचे अनेक प्रयत्न झाले, पण राम आपल्या सगळ्यांच्या मनात!: पंतप्रधान नरेंद्र मोदी
‘आपण सर्व रामाचे, कोणीही अपवाद नाही’: सरसंघचालक मोहन भागवत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

