Share

गेल्या 500 वर्षापासून आम्ही या क्षणाची वाट पाहत होतो- खडसे

Published On: 

मुंबई- राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडला आहे. नरेंद्र मोदी यांनी यावेळी पर्णकुटीत राहणाऱ्या रामलल्लाचे भव्य मंदिर उभे राहणार असल्याचे सांगितले. नरेंद्र मोदी यांनी भूमिपूजनानंतर उपस्थितांना संबोधित केले. नरेंद्र मोदींनी मला निमंत्रण देत या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचा मान दिल्याबद्दल विश्वस्त मंडळाचे आभार मानले.

यावेळी मोदींच्या हस्ते राम मंदिराच्या टपाल तिकीटाचेही अनावरण करण्यात आले. आज संपूर्ण जगभरात प्रभू रामाचा जयघोष होत असल्याचे सांगत मोदींनी सर्व देशवासी आणि जगभरात असलेल्या भारतभक्त आणि रामभक्तांना शुभेच्छा दिल्या.

राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनीही आपल्या आठवणी जागवल्या.गेल्या 500 वर्षापासून आम्ही या क्षणाची वाट पाहत होतो. आज ही अपेक्षा पूर्ण होत आहे, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली.हा आमच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण आहे. गेल्या 500 वर्षांपासून आम्ही या क्षणाची वाट पाहत होतो.आज ही अपेक्षा पूर्ण होत आहे,’ असे एकनाथ खडसे म्हणाले.

‘राम मंदिराच्या आंदोलनामध्ये मी देखील सहभागी होतो. त्यात अनेकांनी बलिदान दिले. त्यात सर्वांचे योगदान आहे. आज त्या सर्वांच्या आशा पल्लवीत झाल्या. राम मंदिराच्या आंदोलनासाठी मी देखील 15 दिवस जेलमध्ये काढले. त्यामुळे आजचा दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय आहे,’ अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसेंनी दिली.

एका बाजूला हे सर्व घडत असताना महाराष्ट्रात मात्र एकमेकांना राजकीय चिमटे काढण्याचे प्रकार सुरूच असल्याचं दिसत आहे.अयोध्या लढ्यात ज्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला होता, अशा संत, महंत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच राममंदिर भूमिपूजनाचा निमंत्रण दिलं, अशा शब्दात भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

जालन्यात बोलताना ते म्हणाले,अयोध्येत राममंदिरासाठी जे काही लढे लढले गेले, त्यात कारसेवक म्हणून माझाही प्रत्यक्ष सहभाग होता, 1990 आणि 1992 च्या लढ्यात उत्तर प्रदेशात गेलो होतो. तिथ कर्वीच्या तुरुगांत आम्हाला ठेवण्यात आलं होतं. आणि आज प्रत्यक्षात प्रभू रामचंद्राच्या मंदिरांची पायभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली असल्याचं रावसाहेब दानवे यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –

भूमिपूजनाच्या दिवशीही टीका-टिपण्णी सुरूच,श्रेयवादाच्या मुद्द्यावरून सामनातून भाजपवर टीका

राम मंदिरामुळे देशात ‘रामराज्य’ स्थापित होईल – रामदेव बाबा

अस्तित्व मिटवण्याचे अनेक प्रयत्न झाले, पण राम आपल्या सगळ्यांच्या मनात!: पंतप्रधान नरेंद्र मोदी

‘आपण सर्व रामाचे, कोणीही अपवाद नाही’: सरसंघचालक मोहन भागवत

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!