Share

अस्तित्व मिटवण्याचे अनेक प्रयत्न झाले, पण राम आपल्या सगळ्यांच्या मनात!: पंतप्रधान नरेंद्र मोदी

Published On: 

अयोध्या: अनेक दशके प्रलंबित राहिलेल्या राम मंदिर निर्माणाचे प्रत्यक्ष काम आता सुरु होत आहे. त्यामुळे ५०० वर्षांचा रामाचा वनवास संपल्याची भावना आता व्यक्त केली जात आहे. बाबराने केलेल्या आक्रमणावेळी राम मंदिर पाडून त्या जागी बाबरी मस्जिद उभारली होती. मात्र, आता अनेक वर्षांच्या कोर्टातील संघर्षानंतर राम जन्मभूमीचा ताबा राम मंदिर निर्माण ट्रस्ट ला सोपावण्यात आल्यानंतर आज भूमीपूजन पार पडत असून मंदिराच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे.

राम मंदिराच्या भूमीपूजनाचा सोहळा अयोध्येत पार पडत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल, महंत नृत्य गोपालदास यांच्या उपस्थितीत मंदिराचा शिलान्यास करण्यात आला आहे. यावेळी प्रतिक म्हणून ९ शिलांचे पूजन मोदींच्या हस्ते करण्यात आले. तर, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या सोहळ्याचे स्वागतीय भाषण केले असून त्यानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांनी देखील आपल्या भावना प्रकट केला.

‘आपण सर्व रामाचे, कोणीही अपवाद नाही’: सरसंघचालक मोहन भागवत

आता, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संबोधित करत असून त्यांनी सुरुवातीला ‘जय सियाराम’ चा गजर केला. यानंतर, ‘त्यांनी हा जयघोष हा फक्त या अयोध्या नगरीतच नाही तर संपूर्ण जगभरात घुमत असल्याचे सांगितले. करोडो रामभक्तांना या सोहळ्यानिमित्त शुभेच्या देखील त्यांनी दिल्या. भारत आज सुवर्णिक अध्याय रचत असून अखंड भारतात राममय झाला आहे. अनेक शतकांची प्रतीक्षा संपली असून आपल्या डोळ्यांसमोर हे मंदिर उभं राहतं बघणे हे खूप भाग्याचं आहे.’

‘आता देश संपूर्ण जगात मान उंचावून सांगू शकेल की…’

पुढे त्यांनी, ‘ जसे भारतातील गुलामगिरी विरोधातील संघर्ष संपून अनेक बलिदानंतर स्वातंत्र्य मिळाले त्या दिवशीचे महत्व आहे तसेच आज या मंदिरासाठीचा महत्वाचा दिन आहे. तसेच, अस्तित्व मिटवण्याचे अनेक प्रयत्न झाले, तरी आज राम हे आपल्या सर्वांच्या मनात आहेत’ असे त्यांनी सांगितले.

मोबाईल कंपनी शिओमी ला भारत सरकारचा मोठा दणका!

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!