Share

“…त्या १५०० हिंदूंसाठी कोण अश्रू ढाळणार?”,‘द कश्मीर फाइल्स’वरुन ओवेसींचा सवाल

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटावरून सध्या राजकारणातही चांगलीच चर्चा रंगल्याचे दिसून येत आहे. तसेच या मुद्द्यावरून राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे वारे वाहू आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर बोलत असतांना हैदराबादचे खासदार आणि एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asduddin Owaisi) यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. तसेच काश्मीरमध्ये मारल्या गेलेल्या त्या १५०० हिंदूंसाठी कोण अश्रू ढाळणार?,असा सवालही ओवेसी यांनी केला आहे.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना ओवेसी म्हणाले की,‘काश्मीरमध्ये काश्मिरी पंडित मारले गेले, माझ्याकडे सगळ्यांची नावे आहेत. परंतु जे १५०० हिंदू मारले गेले, जे काश्मिरी पंडित नव्हते,त्यांच्यासाठी अश्रू कोण ढाळणार?.’ तसेच देशाच्या पंतप्रधानांना एखादा चित्रपट पाहून काश्मिरी पंडितांच्या दु:खाची आठवण का झाली?, असा सवालही ओवेसींनी केला आहे.

दरम्यान, चित्रपट बघितल्यानंतर देशात मुस्लिमांविरुद्ध द्वेष का वाढवला जात आहे? सोशल मीडियावर असे किती व्हिडीओ पडले आहेत, ज्यामध्ये लोकं मुस्लिमांच्या विरोधात भाषण करत आहे, असेही ओवेसींनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!