Share

Arvind Sawant | “बाळासाहेब नक्कीच वरून बघत म्हणत असतील, काय गद्दारांना जन्म दिला आहे”

Published On: 

मुंबई :  रविवारी शिंदे गटाचा पहिला मेळावा कोकणामधील रत्नागिरीमध्ये होता. त्यावेळी शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर एकेरी शब्दात टीका केली. त्यामुळे ठाकरे गटातील नेते कदमांवर आक्रमक झाले आहेत. अशातच शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी रामदास कदम यांच्यावर चांगलाच पलटवार केला आहे.

काय म्हणाले अरविंद सावंत ?

“बाळासाहेब नक्कीच वरून बघत म्हणत असतील, काय गद्दारांना जन्म दिला आहे, असं म्हणत अरविंद सावंत यांनी रामदास कदम यांच्यावर पलटवाल केला आहे. अरविंद सावंत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, रामदास कदम 52 वर्षे शिवसेनेत असल्याचं सांगत आहेत. त्यातील 32 वर्षे विविध पदांवरती होते, हे सुद्धा त्यांनी सांगावं.

जनाची नाहीतर मनाची बाळगा –

भास्कर जाधव राष्ट्रवादीचे अध्यक्ष होते, तेव्हा पक्षात प्रवेश करण्यासाठी रामदास कदम शरद पवार यांच्या गाडीत फिरत होते. मग तुम्ही कसले निष्ठावंत?, असा सवालही अरविंद सावंत यांनी कदमांना केला आहे. तसेच, दापोली आणि खेडमधील जनतेने तुमचा पराभव केला आहे. त्यामुळे जनाची नाहीतर मनाची बाळगा, असं म्हणत सावंतांनी कदमांना खोचक टोला लगावला आहे.

दरम्यान, बाळासाहेब ठाकरे वरुन बघत असतील आणि सांगत असतील, माझा मुलगा उद्धव हा शरद पवारांच्या नादाला लागून बिघडला आहे. तसेच तो सोनिया गांधींच्या नादाला लागूनही बिघडला असल्याचं रामदास कदम यांनी म्हटलं आहे

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!