Share

Bhaskar Jadhav | “…तर राज्यातील महिला रामदास कदमांची जोड्याने पूजा करतील”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई :  कोकणामधील रत्नागिरीत शिंदे गटाने रविवारी पहिला मेळावा घेतला. त्यावेळी रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना एकेरी भाषेत लक्ष्य केलं.  बाळासाहेब ठाकरे वरुन बघत असतील आणि सांगत असतील, माझा मुलगा उद्धव हा शरद पवारांच्या नादाला लागून बिघडला आहे. तसेच तो सोनिया गांधींच्या नादाला लागूनही बिघडला असल्याचं कदमांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून ठाकरे गटातील नेते भडकले आहेत. अशातच शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी कदमांना प्रत्युत्तर दिलं आहे.

काय म्हणाले भास्कर जाधव ?

सभेमध्ये रामदास कदमांनी वापरलेली भाषा आजतागायत कुणीही वापरली नाही. सभेमधील कदमांचं भाषण ऐकलं तर महाराष्ट्र राज्यातील महिला वर्ग रामदास कदमांची जोड्याने पूजा करतील, असं म्हणत भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्यावर हल्ला केला आहे. भास्कर जाधवांनी प्रसारमध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

रामदास कदमांची भाषा ही वैचारिकतेला छेद देणारी आहे –

पुढे बोलताना भास्कर असंही म्हणाले, मुंबईत एक कोटी 30 लाख जनता राहते, त्या जनतेकरता मुंबईत शौचालयांची व्यवस्था आहे. त्या शौचालयांतून जेवढी घाण बाहेर पडत नाही, तेवढी घाण काल रामदास कदमांच्या तोंडून बाहेर पडली आहे. त्याचप्रमाणे रामदास कदम यांनी घेतलेली सभा राजकीय ही वैचारिकतेला छेद देणारी असल्याचंही त्यांनी म्हटलं.

दरम्यान, रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंसोबत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर नुसती दाढी वाढवून फायदा काय? लग्न तर करुन बघ म्हणजे समजेल तुला संसार काय असतो ते, असं म्हणत निशाणा साधला आहे. याचबरोबर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंना देखील लक्ष्य केलं

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!