🕒 1 min read
मुंबई : 2024 च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या विरोधात कोणता चेहरा असणार असा सवाल सध्या रंगू लागला आहे. भाजप पक्षाला आव्हान देण्यासाठी विरोधकांची एकी करणासाठी अनेक नेते प्रयत्न करीत आहेत. या पाश्वभूमिवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना अनेक सवाल विचारण्यात आले होते.
शरद पवार यांचं वक्तव्य :
2024 मध्ये विरोधी पक्ष एकत्र येऊन लढेल का?, असा प्रश्न शरद पवार यांना सोलापूर येथे झालेल्या पत्रकार परिषद मध्ये विचारण्यात आला होता. एकत्रित काहीतरी करावं अशी इच्छा सर्वांची आहे. मात्र, अद्याप याबाबत काही नियोजन करण्यात आलेलं नसून नितीश कुमार, ममता बॅनर्जी यांनी माझी भेट घेत मत मांडली आहेत. तरी त्यांचे निर्णयात रूपांतर झालेलं नसल्याचं उत्तर शरद पवार यांनी दिलं आहे.
काँग्रेस या सर्वांमध्ये अडसर ठरत नाही :
दरम्यान, काँग्रेस या सर्वांमध्ये अडसर ठरत नसल्याचंही शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. काँग्रेस सोबत घेऊ नये असं काहींचं म्हणणं आहे पण मला वाटतं कोणी कोणाला सोबत घेऊ नये ही भूमिका घेऊ नये, असं शरद पवारांनी याबाबत वक्तव्य केलं आहे.
दरम्यान, कारण नसताना संजय राऊत यांना तुरुंगात टाकण्यात आलं आहे. आम्ही वाऱ्यावर सोडलं आहे, असं बोलत आहेत. हा सत्तेचा गैरवापर असून अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय राऊत यांना विनाकारण जेलमध्ये टाकलं आहे, असा आरोप शरद पवारांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Raj Thackeray | “होय! विदर्भाकडे माझं दुर्लक्ष झालं, मात्र…”, राज ठाकरेंनी दिली कबुली
- Sharad Pawar । शिंदे साहेबांनाही दसरा मेळावा घेण्याचा अधिकार आहे, तेही घेऊ शकतात, पण…; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
- Bhaskar Jadhav | “मुंबईतील शौचालयात जेवढी घाण नाही, तेवढी…” भास्कर जाधवांचं रामदास कदमांना प्रत्युत्तर
- Raj Thackeray | “वेदांता प्रकल्प गुजरातला गेला कसा? त्याची चौकशी करा”, विदर्भ दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंची प्रतिक्रीया
- Nitin Deshmukh | “राज्यात पैशांनी सत्तांतर झालं, हे सिद्ध केलं नाही तर विधानसभेत आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
