🕒 1 min read
नागपूर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या पाच दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. रविवार आणि सोमवारी नागपूर येथे राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत राज ठाकरे यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं असून विदर्भकडे त्यांचं दुर्लक्ष झालं असल्याची त्यांनी कबुली दिली आहे.
राज ठाकरे यांनी दिली कबुली :
पत्रकार परिषदमध्ये मनसेची पदं बरखास्त करण्याची वेळ आली म्हणजे तुमचं विदर्भाकडे दुर्लक्ष झालं असं वाटत नाही का?, असा सवाल राज ठाकरेंना विचारण्यात आला होता. यावर त्यांनी उघडपणे याबाबत कबुली देत, होय माझ्याकडून आमच्या सहकाऱ्यांकडून दुर्लक्ष झालं. मात्र, यापुढे असं होणार नसल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
नागपूरमधील मनसेची पदं बरखास्त करण्याचं कारण:
नागपूरमधील मनसेची पदं बरखास्त करण्याचं कारण राज ठाकरेंनी यावेळी दिलं आहे. नागपूर मध्ये काही चुकीची काम सुरू होती. पक्षाला सोळा वर्षे झाली मात्र त्यामानाने अपेक्षित पक्ष वाढीचं काम नागपूर मध्ये झालेलं नसल्यामुळे पदं बरखास्त करण्याचा निर्णय घेतला असल्याचं राज ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे.
दरम्यान, नागपूर शहर आणि जिल्ह्यातील आमचे जे काही सेल्स आहेत, महत्त्वाची पदे आहेत ती बरखास्त करत आहे, घटस्थापनाच्या दिवशी नवीन कार्यकारणी जाहीर करेल, आता 27 सप्टेंबरला पदाधिकाऱ्यांची मुंबईमध्ये बैठक होणार असून 28 तारखेला आमचे काही नेते नागपूर मध्ये येतील आणि नवरात्रीनंतर मी कोल्हापूर मार्गे कोकण दौरा करणार असून दोन दिवसांसाठी मी पुन्हा नागपुरात पक्ष बांधणीसाठी येणार असल्याचं राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Sharad Pawar । शिंदे साहेबांनाही दसरा मेळावा घेण्याचा अधिकार आहे, तेही घेऊ शकतात, पण…; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
- Bhaskar Jadhav | “मुंबईतील शौचालयात जेवढी घाण नाही, तेवढी…” भास्कर जाधवांचं रामदास कदमांना प्रत्युत्तर
- Raj Thackeray | “वेदांता प्रकल्प गुजरातला गेला कसा? त्याची चौकशी करा”, विदर्भ दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंची प्रतिक्रीया
- Nitin Deshmukh | “राज्यात पैशांनी सत्तांतर झालं, हे सिद्ध केलं नाही तर विधानसभेत आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही”
- Raj Thackeray | भाजप-मनसे युतीवर राज ठाकरेंचं एका वाक्यात उत्तर, म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
