Share

अर्जुन रामपालच्या अनोख्या लुकची सोशल मीडियावर रंगली चर्चा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सुशांत सिंह प्रकरणामध्ये अमली पदार्थ सेवन करणाऱ्या अनेक बॉलीवूड कलाकारांचे नाव समोर येत होते. NCB ने या प्रकरणात अमली पदार्थ सेवन कनेक्शन शोधून काढले आणि अनेकांची चौकशी सुरु केली आहे. अशातच यामध्ये बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल याचंही नाव ड्रग केसमध्ये समोर आलं होतं. यासंदर्भात त्याची चौकशीही करण्यात आली होती. त्यामुळे तो चांगलाच चर्चेत आला होता. मात्र सध्या त्याची अनोख्या हेअर स्टाइलमुळे सोशल मीडीयावर चर्चा होत आहे.

https://www.instagram.com/p/CQQBSEktUlb/?utm_source=ig_web_copy_link

अर्जुन नेहमीच त्याच्या केसांसोबत निरनिराळे प्रयोग करताना दिसतो. कधीकाळी अर्जुनच्या लांब केसांवर मुली फिदा होत असत. त्यानंतर अचानक अर्जुनने त्याचे केस छोटे केले होते. आपल्या नव्या हेअरस्टाइलचा फोटो अर्जुनने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यासोबतच त्याने आपल्या केसांवर प्रयोग करण्याचं कारणही सांगितलं आहे. अर्जुनने लिहिलं, ‘चित्रपटामधला एक असा भाग ज्याने मला स्वतःमध्ये बदल करण्यासाठी भाग पाडलं.’ त्यासोबतच अर्जुनने त्याच्या हेअरस्टायलिशला धन्यवाद दिले आहेत.

अर्जुनने नवी हेअरस्टाइल केली असून त्याने केसाला प्लॅटिनम कलर केला आहे. या फोटोमध्ये अर्जुन एखाद्या हॉलीवूड स्टार दिसत असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगत आहे. या नव्या लूकला त्याच्या चाहत्यांनी पसंती दिली आहे. सध्या अर्जुनचा हा फोटो पाहून अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!