🕒 1 min read
मुंबई : कोरोना काळात पंढरपुरच्या पायी वारी बद्दलचा वाद सुरूच आहे. पायी वारी न करता एसटी महामंडळाच्या बसमधून वारी करण्याची मुभा राज्य सरकारने दिली आहे. त्या ऐवजी पायी वारीची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. यावरुन भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारवर टीका केलीय. नियम पाळून शिस्तीने पायी वारीसाठी परवानगी देण्याची मागणी पडळकर यांनी केली आहे.
या संदर्भात पडळकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीय. यामध्ये त्यांनी राज्य सरकारच्या या निर्णयावर टीका केलीय. त्यांनी म्हटले की, ‘वारी व्हावी म्हणुन छत्रपती संभाजी महाराजांनी वारीला औरंगजेबाच्या काळात सरंक्षण दिले होते. हे ‘सोनिया’ सेनेचे अध्यक्ष नाव महाराजांचं घेतात काम मात्र औरंगजेबाचं करतात. वारकरी कोविडचे सर्व नियम पाळून शिस्तीने पायी वारीसाठी तयार असताना सुद्धा हे ठाकरे सरकार कुणाच्या दबावाखाली या शेकडो वर्ष चालत आलेल्या हिंदू परंपरेत खोडा घालतंय? मी ३ जुलै रोजी आळंदी ते पंढरपूर निघणाऱ्या ‘माझी वारी माझी जबाबदारी’ मध्ये स्वत: वारकरी म्हणून सहभागी होणार आहे.’
वारी व्हावी म्हणुन छत्रपती संभाजी महाराजांनी वारीला औरंगजेबाच्या काळात सरंक्षण दिले होते. हे ‘सोनिया' सेनेचे अध्यक्ष नाव महाराजांचं घेतात काम मात्र औरंगजेबाचं करतात.
वारकरी कोविडचे सर्व नियम पाळून शिस्तीने पायी वारीसाठी तयार असताना pic.twitter.com/hRDND9qJgn— Gopichand Padalkar (@GopichandP_MLA) June 19, 2021
आषाढी एकाशदशीनिमित्त वारकरी संप्रदाय वारी सोहळ्यासाठी पंढरपूरपर्यंत पायी जातो. मात्र, गेल्या वर्षी कोरोना संकटामुळे ही वारी रद्द करण्यात आली होती. यंदाही ही वारी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मात्र, नियमांसह वारी करु द्या, अशी मागणी करण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अजितदादा… हे वागणं बरे नव्हे… आरोग्य कर्मचाऱ्यांवर लाठीचार्ज होणे हे संतापजनक आहे
- बीडमध्ये सध्या आंदोलनाचे वारे; आता २१ जूनला ‘रास्ता रोको’
- ‘१२ वी नापास पण टीका करण्यात अव्वल’ ; केआरकेने पुन्हा एकदा साधला कंगनावर निशाणा
- पहिल्या दिवशी वरुणदेवाने बॅटिंग केल्यामुळे खेळ वाया; दुसऱ्या दिवशीही पावसाची शक्यता
- ‘आम्ही एक महान खेळाडू गमावून बसलो’ ; मोदींनी व्यक्त केल्या भावना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
