नवी दिल्ली : फ्लाईंग सिख म्हणून ओळख असलेले दिग्गज धावपटु मिल्खा सिंग यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९१व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसापुर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयातून सांगण्यात आले होते. पण मात्र अखेर कोरोनाविरुद्धच्या लढ्यात त्यांची हार झाली.
काही दिवसापुर्वी मिल्खा सिंग यांना कोरोनाची लागण झाली होती. यादरम्यान ते सुरुवातीच्या काळात चंदीगड येथील घरीच उपचार घेत होते. मात्र सोमवारी २४ मे रोजी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना मोहाली येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही दिवसातच त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. मात्र प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना पुन्हा चंदीगड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची ऑक्सिजन पातळी कमी झाली आणि अखेर १८ जुन रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.
I had spoken to Shri Milkha Singh Ji just a few days ago. Little did I know that it would be our last conversation. Several budding athletes will derive strength from his life journey. My condolences to his family and many admirers all over the world.
— Narendra Modi (@narendramodi) June 18, 2021
त्यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. मिल्खा सिंह यांच्या निधनाने आम्ही एक महान खेळाडू गमावून बसलो आहे. ज्यांनी देशाच्या कल्पनेवर कब्जा केला होता. करोडो भारतीयांच्या हृदयात ज्यांनी हक्काचं स्थान मिळवलं होतं. ते मिल्खा सिंग आपल्यात राहिले नाहीत, त्यांच्या निधनाने मी दु:खी आहे, अशा भावना मोदी यांनी व्यक्त केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- औरंगाबादची चिंता वाढली, ग्रामीण भागातील रुग्ण संख्येत पुन्हा वाढ
- आरटीपीसीआर टेस्ट ट्यूबमध्ये डास, हा प्रकार पहिल्यांदाच घडल्याचा आरोग्य अधिकाऱ्यांचा दावा!
- अन् भुशी धरण ओव्हर फ्लो ; पण पर्यटकांना वर्षाविहार करण्यास मनाई
- पावसाने केला ‘गेम’; भारतीय संघ अजूनही करू शकतो ‘प्लेइंग ११’ मध्ये बदल ! घ्या जाणून
- राज्य सरकार केंद्राला भाड्याने चालवायला द्या – माजी मंत्री बबनराव लोणीकर


