Share

बीडमध्ये सध्या आंदोलनाचे वारे; आता २१ जूनला ‘रास्ता रोको’

Published On: 

🕒 1 min read

बीड: जून महिना सुरू झाला तसं बीडमध्ये आंदोलनाचे वारे वाहू लागले होते, आता पुन्हा एकदा आंदोलन होणार असल्याचे बोलले जात आहे. सोमवारी म्हणजे दि. २१ जूनला ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात येणार आहे. केज शहरातून जाणाऱ्या अहमदनगर-अहमदपूर व खामगाव-पंढरपूर आशा या दोन राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर केज विकास संघर्ष समितीच्या वतीने ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्याचा इशारा तहसीलदारांना देण्यात आला आहे.

केज शहरातून जाणाऱ्या या दोन राष्ट्रीय महामार्गाचे कामे शहरात काम अत्यंत संथगतीने व दर्जाहीन होत आहेत. ही रेंगाळलेली कामे तात्काळ गती वाढवून दर्जेदार काम करावेत या मागणीसाठी केज विकास संघर्ष समितीच्या वतीने सोमवारी रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा तहसीलदारांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे. केज शहरातून या दोन राष्ट्रीय महामार्गाची कामे शहरात मागील दीड वर्षांपेक्षा अधिक काळापासून सुरू आहेत. कामे ही अखंडितपणे केली जात नसून आठवडाभर काम करायचे आणि दोन ते तीन महिने काम बंद ठेवायचे अशा प्रकारे काम केले जात आहे. केज – कळंब रस्त्यावर मेगा कंपनी काम करीत असून या कंपनीने मोंढ्या नजीक लेंडी नदीवर पुलाचे काम सुरू केले आहे. पुलाचे काम मागील दोन महिन्यांपासून अर्धवट ठेवले असून रेंगाळलेले आहे. तर नाली बांधकाम पूर्ण केलेले नाही. ज्या भागात काम केले आहे, ते ही अत्यंत निकृष्ठ दर्जाचे झाले आहे, अशी तक्रार येथील नागरिकांकडून करण्यात आली आहे.

या कंपनीने पुलाच्या कामासाठी तयार केलेला पर्यायी रस्ता देखील अत्यंत वाईट अवस्थेत व धोकादायक स्थितीत आहे. कंपनीने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कमानीच्या बाजूने तयार केलेला पर्यायी रस्ता चांगल्या अवस्थेत तयार करणे गरजेचे आहे. वास्तविक पाहता दोन्ही कंपन्यांनी केज शहर अंतर्गत भागातील या महामार्गाचे काम लॉकडाऊन सुरू असताना पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र दोन्ही कंपनीच्या हलगर्जीपणामूळे हे काम रखडलेले आहे. आता या दोन्ही कंपन्यांनी केज शहर अंतर्गत भागातील सुरू असलेले काम तात्काळ अखंडितपणे सुरू ठेवून पूर्ण करावे या मागणीसाठी या दोन्ही कंपन्यांच्या विरोधात केज विकास संघर्ष समितीच्या वतीने सोमवारी दुपारी १ वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कमानीमध्ये बेमुदत रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा समितीचे समन्वयक हनुमंत भोसले, नासेर मुंडे, महेश जाजू यांनी तहसीलदारांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!