Share

पहिल्या दिवशी वरुणदेवाने बॅटिंग केल्यामुळे खेळ वाया; दुसऱ्या दिवशीही पावसाची शक्यता

Published On: 

इंग्लंड : जागतिक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेला कालपासून सुरुवात होणार होती. पहिल्या-वहिल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशीपच्या सामन्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष आहे. क्रिकेटरसिकांसाठी असलेल्या या खास पर्वणीवर मात्र काल पावसाने पहिल्या दिवशी पाणी फेरले आहे. साउथहॅमप्टटनमध्ये भारतीय वेळेनुसार काल दुपारी तीन वाजतापासून सामना सुरु होणे अपेक्षित होते. मात्र, पावसाच्या हजेरीमुळे ना नाणेफेक झाली ना खेळ सुरु होऊ शकला.

त्यामुळे आज स्थानिक वेळेनुसार सकाळी 10.30 वाजता  (भारतीय प्रमाण वेळेनुसार ठीक 3 वाजता) खेळाला सुरुवात केली जाईल, अशी माहिती आयसीसीकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, अंतिम सामन्याआधी साऊथॅम्प्टनचे हवामान खूपच खराब असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हवामान अहवालानुसार 18 ते 22 जून दरम्यान साऊथॅम्प्टनमध्ये पावसाची शक्यता आहे. दोन दिवस पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. याचा परिणाम अंतिम सामन्यावर होण्याची शक्यता आहे. आजचा सामना होणार की नाही याकडे देखील आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

आता भारत-न्यूझीलंड यांच्यातला सामना आजपासून सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता या कसोटीच्या निकालासाठी राखीव दिवस नसणार आहे. त्यामुळे पुढील पाच दिवसांत निकाल न लागल्यास दोन्ही संघांना संयुक्त जेतेपदावर समाधान मानावे लागेल.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!