Share

‘१२ वी नापास पण टीका करण्यात अव्वल’ ; केआरकेने पुन्हा एकदा साधला कंगनावर निशाणा

Published On: 

मुंबई : अभिनेता कमाल रशिद खान नेहमी त्याच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतो. मात्र त्याच्या या वक्तव्यामुळे तो अनेकवेळा अडचणीत देखील सापडला आहे. मध्यंतरी रशिद खान याच्यावर ‘राधे’ चित्रपटाच्या रिव्ह्यू संदर्भात अभिनेता सलमान खानने मुंबई कोर्टात मानहानीचा दावा केला. यासंदर्भात अभिनेता कमाल रशिद खानला नोटीस पाठवण्यात आली. त्या नंतर सर्वत्र या प्रकरणाची चर्चा सुरु झाली. त्यामुळे सध्या केआरके कोणत्या न कोणत्या कारणामुळे सध्या सतत चर्चेत येत आहे.

नुकतेच त्याने कंगनाला ‘दीदी’ म्हणाल्यामुळे सोशल मीडीयावर केआरकेला ट्रोल करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा केआरकेने कंगना विरुद्ध एक ट्विट केलं आहे. कंगना रणौतच्या पासपोर्ट रिन्यूअल प्रकरणावरून केआरकेने यावेळी कंगनावर निशाणा साधला आहे.

https://youtu.be/-XjdMKn01yM

केआरकेने एक व्हिडीओ शेअर करत कंगना रणौतला सुनावलं आहे. केआरकेने त्याच्या यूट्यूब चॅनलवर हा व्हीडीओ शेअर केला आहे. यात केआरकेने कंगनाचा ‘१२ वी नापास’ असा उल्लेख केलाय. एवढचं नाही तर कंगनाने द्वेष करण्यात पीएचडी केल्याचं तो म्हणालाय. तर कंगनाने काही तरी सेटिंग करत ४ राष्ट्रीय पुरस्कार आपल्या नावावर केल्याचा आरोप देखील त्याने केला आहे.

‘कंगनाला १५ जून ते १० ऑगस्ट या काळात बूडापेस्ट आणि हंगेरीमध्ये प्रवास करायाचा आहे. ‘धाकड’ सिनेमाच्या दुसऱ्या शेड्यूलचं शूटिंग बाकी आहे’. यासाठी कंगनाला प्रवास करणं गरजेच आहे. मात्र, कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा असल्याने कंगनाचा पासपोर्ट रिन्यू करण्यास प्राधिकरणाने नकार दिला. त्यानंतर कंगनाने पासपोर्ट रिन्यूअल करण्यात यावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र तिथेही तिच्या पदरी निराशा पडली. न्यायालयाने कंगनाला फटकारत सुनावणी २५ जूनला पुढे ढकलली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!