Share

पुढाऱ्यांना कोरोना गिफ्ट देणाऱ्या ‘त्या’ लग्नातील नवरीही आता कोरोना पॉझिटीव्ह

Published On: 

मुंबई : भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshawardhan Patil) यांची कन्या बावडा लाखेवाडी (ता. इंदापूर) गटाच्या जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील (Ankita Patil) यांचा मुंबई येथील ताज हॉटेलमध्ये निहार बिंदूमाधव ठाकरे (Nihar Thackrey) यांच्याशी दि.२८ डिसेंबर रोजी विवाह झाला. या विवाहसोहळ्यात अनेकांना कोरोनाची लागण (Corona Positive) झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या विवाहसोहळ्यात अनेक बड्या नेत्यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर एक एक करुन अनेक नेते कोरोना पॉझिटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली होती. आता या लग्नातील नवरीच कोरोना पॉझिटीव्ह आली आहे.

याबाबत अंकीता पाटील यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. अंकिता म्हणाल्या, ‘आज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. माझी तब्येत व्यवस्थित आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेणार आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी व सर्वांनी आपली काळजी घ्यावी.’ असे आवाहन अंकिता पाटील यांनी केले आहे.

कोरोना विषाणुच्या (Covid 19) पार्श्वभूमीवर राज्यात सध्या निर्बंध लावले असले तरी, अनेक नेत्यांनी आपल्या मुलांच्या विवाह सोहळ्याच कोरोना नियमांची पायमल्ली केल्याचं दिसून आलं आहे. या लग्नानंतर भाजप नेते तथा नवरीचे वडील हर्षवर्धन पाटील कोरोना पॉझिटीव्ह आले. या विवाह सोहळ्याला उपस्थित असलेल्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे व त्यांचे पतीही पॉझिटीव्ह आले. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक नेत्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!