Share

पुन्हा वानखेडेंबाबत बोलाल तर… ; न्यायालयाने दिला मलिकांना कारवाईचा इशारा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) हे सतत एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर आरोप करत असतात. मात्र आता समीर वानखेडे यांच्याविषयी वक्तव्यं करणं नवाब मलिक यांना महागात पडणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने तशी तंबी देखील नवाब मलिक यांना या पूर्वी दिली होती. मात्र तरी देखील नवाब मलिक समीर वानखेडे यांच्याबद्दल वक्तव्य करतच होते.

मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) दिलेल्या प्रतिज्ञापत्रामुळे नवाब मलिक (Nawab Malik) यांना वानखेडे यांच्याविषयी बोलता येणार नाही. त्यामुळे मागील काही दिवसांपासून मलिकांकडून वानखेडे यांच्याविषयी एकही ट्विट करण्यात आलेले नाही. मात्र रविवारी ट्विटर स्पेसवर त्यांनी वानखेडेंवर पुन्हा निशाणा साधला होता. तसेच तीन डिसेंबर रोजी फेसबुकवरही एक पोस्ट टाकली होती. दादर चैत्यभूमीवरही त्यांनी वानखेडेंविषयी वक्तव्य केलं होतं. त्यावरून समीर वानखेडे यांच्या वडील ज्ञानदेव वानखेडे (Dnyandev Wankhede) यांनी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. यामध्ये मलिकांवर न्यायालयाचा अवमान केल्याचा दावा करण्यात आला आहे. आज त्यासंदर्भात कोर्टात सुनावणी झाली.

न्यायालयाने मलिकांच्या वकिलांना थेट सवाल करत मलिक हे मंत्री म्हणून बोलत आहेत की वैयक्तिक हे सांगा. ते वैयक्तिक बोलत असतील तर त्यांना लगेच न्यायालयात बोलवावं लागेल, असं न्यायालय म्हणाले. त्यावर मलिक यांच्या वकिलांनी मलिक यांनी ते वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते या नात्याने केल्याचे सांगितले. न्यायालयाला हमी देऊन ही त्याचे उल्लघंन केले आहे. त्यामुळे तुमच्यावर न्यायालयाच्या अवमानाची कारवाई का करू नये, अशी विचारणा करत न्यायालयाने मलिकांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले. आता या प्रकरणावर १० डिसेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!