Share

कोरोना काळात आशा सेविकांनी केलेले कार्य कौतुकास्पद- आ. प्रदिप जैस्वाल

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : मागच्या २ वर्षांच्या कोरोनाच्या काळात आशा सेविकांनी केलेले कार्य अतिशय मोलाचे आहे. ज्या काळात कोरोना बाधित रुग्णांना त्यांचे जवळचे नातेवाईक हात लावायला सुद्धा घाबरत होते अशा वेळेस स्वतःच्या जीवाची, आपल्या कुटुंबातील सदस्यांची पर्वा न करता आशा सेविकांनी केलेले कार्य कौतुकास्पद असून समाजातील प्रत्येक व्यक्तीसाठी प्रेरणा देणारे असल्याचे प्रतिपादन शिवसेना आमदार प्रदीप जैस्वाल यांनी केले. आमदार अंबादास दानवे यांच्या वाढदिवसानिमित्त आशा सेविकांना भाऊबीज भेट या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील आशा सेविकांना भाऊबिज भेट या कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक आत्माराम पवार यांनी केले होते. या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी आमदार प्रदिप जैस्वाल, क्रेडाई महाराष्ट्र राज्य संघटनेचे अध्यक्ष प्रमोद खैरनार, मसिआचे अध्यक्ष नारायण पवार, यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना आमदार अंबादास दानवे म्हणाले की आशा सेविकांना येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी शिवसेना कटिबद्ध असून त्यासाठी प्राधान्य दिले जाईल.

तापडिया नाट्य मंदिर या ठिकाणी घेतलेल्या या भाऊबीज कार्यक्रमात मध्ये एकूण २५० आशा सेविकांना भाऊबीज म्हणून साडी भेट देण्यात आली. यावेळी विधानसभा संघटक राजु वैद्य, उपजिल्हाप्रमुख संतोष जेजुरकर, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात आदी शिवसैनिक पदाधिकारी आशा सेविका नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!