Share

Shivsena | ‘शत्रू हा शत्रूच’; शिंदे गटाने हिंदुत्वाचा नारा देत लावले भन्नाट बॅनर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई  : कोरोना संसर्गामुळे सर्वांचा आवडता दहीहंडीचा सण गेल्या दोन वर्षांपासून साजरा झाला नव्हता. मात्र यंदा एकनाथ शिंदे सरकारने सण व उत्सवांवरील निर्बंध हटवले आहेत. यामुळे राज्यभरात मोठ्याने दहीहंडी उत्सव साजरा करण्याचा मार्ग मोकळा झाला असून जोरदार आयोजन देखील करण्यात आलं आहे. मात्र, टेंभी नाक्यावरील दहीहंडीच्या उत्सवामध्ये शिंदे गटाने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बॅनरबाजी केली आहे.

ठाण्यात मानाची समजली जाणारी टेंभी नाक्यावरील दहीहंडी उत्सवाने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. या नाक्यावरील दहीहंडी उत्सव हा आनंद दिघे यांनी सुरू केला होता. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या उत्सवाला विशेष उपस्थिती लागणार आहे.

टेंभी नाक्यावर उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बॅनरबाजीः

टेंभी नाक्यावरी दहीहंडी उत्सावामध्ये शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बॅनरबाजी केली. या बॅनरच्या माध्यमातून माजी उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जोरदार टोला लगावण्यात आला. राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत कधीही जाणार नसल्याबाबत दिव्यांगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या विधानांची या बॅनरच्या माध्यमातून आठवण करून देण्यात आली.

राजन विचारे यांची एकनाथ शिंदे यांच्यावर टीका –

दरम्यान, शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी शिंदेंवर टीका करत यंदा दहीहंडीत निष्ठेचे थर लागणार असल्याचं विधान केलं होतं. याच टीकेला उत्तर देत शिंदे गटाने हिंदुत्वाचा नारा देत बॅनर लावले.

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!