Share

Tejas Thackeray | बुडत्या शिवसेनेला तेजस ठाकरे वाचवणार? लवकरच होऊ शकते राजकारणात एंट्री

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ठाकरे घराण्याचा आणखी एक दिवा लवकरच महाराष्ट्राच्या राजकारणात उतरू शकतो. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा धाकटा मुलगा तेजस ठाकरे राजकीय इनिंगला सुरुवात करू शकतो, असे वृत्त आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही. सध्या आदित्य ठाकरे राजकारणात पूर्णपणे सक्रिय आहे. ते महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रीही राहिले आहेत.

तेजस ठाकरे यांचा चेहरा दहीहंडी उत्सवात प्रकाश झोतात-

विशेष बाब म्हणजे कधीकाळी क्वचीत मंचावर दिसणारा तेजसचा चेहरा यावेळी दहीहंडी उत्सवात प्रकाश झोतात आहे. मुंबईतील गिरगाव परिसरातील अनेक पोस्टर्समध्ये त्यांचा फोटो झळकला आहे. या पोस्टर्समध्ये दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे ‘हिंदुहृदयसम्राट’, उद्धव यांचे ‘कुटुंब प्रमुख’, आदित्य यांचे ‘युवा नेते’ आणि तेजस यांचे ‘युवा शक्ती’ असे वर्णन करण्यात आले आहे. त्यामुळे ते लवकरच राजकारणात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात आता नागरी निवडणुकाही येऊ घातल्या आहेत. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे, आदित्य यांच्यानंतर आता तेजसही राजकारणात सक्रिय होऊ शकतो.

आदित्य यांच्यावर शिवसेनेच्या अस्तित्वाची जबाबदारी –

नुकत्याच झालेल्या पक्षांतर्गत बंडानंतर तेजसच्या राजकारणात येण्याची शक्यता अत्यंत महत्त्वाची मानली जाऊ शकते. मोठ्या संख्येने आमदार गेल्यानंतर आदित्य यांच्यावर शिवसेनेच्या अस्तित्वाची मोठी जबाबदारी आली आहे. जूनमध्ये विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सुमारे ४० आमदारांनी उद्धव ठाकरे गट सोडण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार पडले.

राज ठाकरे यांचा मुलगा अमितही राजकारणात सक्रिय-

याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमितही राजकारणात सक्रिय झाला आहे. राज्यात अनेक ठिकाणी ते कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!