Share

BJP | भाजप नेत्याने केला छत्रपती शिवरायांचा अपमान; प्रतिमेला हार घालण्यास टाळाटाळ

Published On: 

मध्यप्रदेश : सोशल मीडियावर भाजपच्या एका मंत्र्यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यात ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालण्यास सांगितल्यावर चिडचिड करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ महाराष्ट्रातला नसून मध्यप्रदेशमधला आहे. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह हे मध्यप्रदेशच्या दौऱ्यावर आले आहेत. मंत्री गिरीराज सिंह हे जाम सावली मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर सौसरला एका कार्यक्रमासाठी पोहचले होते. त्यावेळी त्यांना तेथील स्थानिक कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालण्यास सांगितले. मात्र त्यावर ते भडकले आणि त्यांनी हार घालायला टाळाटाळ केली. तर हा व्हिडीओ काँग्रेसने शेयर केला आहे.

उपस्थित कार्यकते शिवाजी महाराजांचा जयघोष करत गिरीराज सिंह यांना शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या दिशेने घेऊन जात होते. त्याचवेळी गिरीराज यांनी घोषणाबाजी थांबवली आणि भाजपचे स्थानिक नेते संतोष जैन यांच्यावर चिडले. “तुम्ही मला इकडे चला तिकडे चला असं का करताय? आम्हाला कार्यक्रमाबद्दल काही माहितीच दिलेली नाही.”, असं म्हणत ते उपस्थित कार्यकर्त्यांवर डाफरले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांचा राग शांत करत त्यांना पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्याची विनंती केली. त्यांनतर गिरीराज यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार अर्पण केला.

तेथील कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे कि येथे येणारे सर्व नेते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालतात, ही सौसरची परंपरा आहे. त्यामुळे आम्ही त्यांना विनंती केली परंतु मंत्र्यांनी आमची विनंती प्रोटोकॉलचा हवाला देऊन नाकारली. त्यानंतर त्यांनी त्यांना या कार्यक्रमाशी संबंधित कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले. पण नंतर आमच्या विनंतीवरून त्यांनी पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!