Share

Devendra Fadnavis | हे तुमचं सरकार, आजचा दिवस तुम्हाला समर्पित करतो- देवेंद्र फडणवीस

Published On: 

ठाणे : दहीहंडी हा महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा होणार सण आहे. आजच्या दिवशी ठिकठिकाणी भव्य दहीहंड्या बांधल्या जातात. जवळपास सर्वच नेते मंडळींकडून या दहिहंड्यांचं आयोजन केलं जात. दिग्गज नेते आणि अनेक कलाकारही या कार्यक्रमाला उपस्थित राहतात. विशेषतः मुंबई आणि ठाण्यातील दहीहंडया आणि त्याच आयोजन करणारी अनेक मंडळं खूपच प्रसिद्ध आहेत. अशीच दहीहंडी भाजपच्या वतीने वरळी येथील जांबोरी मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. या दहीहंडी कार्यक्रमात भाजपच्या अनेक बड्या नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आणि भाजप नेते प्रवीण दरेकर उपस्थित होते.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित गोविंदा पथकांना उद्देशून त्यांचे मनोगत व्यक्त केले. फडणवीस म्हणाले कि, “कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं आहे कि आता दहीहंडीचा समावेश साहसी खेळांमध्ये करण्यात आला आहे. तुम्हाला सर्व प्रकारच्या सोयी सुविधा आणि लाभ मिळणार आहेत. तुमची सर्व काळजी सरकार घेणार आहे. हे तुमचं सरकार आहे. तरुणाईचं सरकार आहे. म्हणूनच मी आजचा दिवस तुम्हाला समर्पित करतो. दहीहंडीच्या खूप शुभेच्छा, जय गोविंदा!” तर यावेळी आशिष शेलार यांनीही त्यांचे मनोगट व्यक्त केले.

शिंदे आणि ठाकरे गटात पोस्टर वॉर

ठाण्यातील टेंबी नाका परिसरात शिंदे गटाची दहीहंडी पार पडणार आहे. तर जांभळी नाका परिसरात उद्धव ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी आयोजन केलेली दहीहंडी पार पडणार आहे. ठाकरे गटाच्या पोस्टर्सवर बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो लावण्यात आले आहेत. तर यात शिंदे गटाच्या पोस्टर्सवर बाळासाहेब ठाकरे यांच्यासह एकनाथ शिंदे, आनंद दिघे, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांचे देखील फोटो पाहायला मिळत आहेत. तर याच पोस्टर्सवर ‘शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही’ हे बाळासाहेब ठाकरेंचं विधान लिहून ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तर ठाण्यातील ठाकरे गटाच्या दहीहंडीच्या कार्यक्रमाला शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या परिसरातील बॅनर्सवर ‘निष्ठेचा थर’ अशी टॅगलाईन छापण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही गटांमध्ये एकप्रकारे पोस्टर वॉर सुरु असल्याचं चित्र मुंबई आणि ठाण्यात पाहायला मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!