Share

Ajit pawar | “दिल्लीतून सिग्नल मिळत नाही तोपर्यंत…”; मंत्रिमंडळ विस्तारावरुन अजित पवारांचा इशारा

Published On: 

पुणे : राज्यात शिंदे सरकार अस्तित्वात येऊन आता जवळपास १ महिना होऊन गेला. मात्र अद्याप मंत्रिमंडळ विस्तार नाही. यावरून विरोधक वारंवार सरकारवर टीका करत असतात. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांच्याही सध्या दिल्ली वाऱ्या सुरु आहेत. याआधी अनेकवेळा मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भाकीत केली जात होती. मात्र अजूनही मंत्रिमंडळ विस्तार राखडलेलाच आहे. त्यातच विरोधी पक्षनेते अजित पवार हे यावरून वारंवार सरकारला जाब विचारत आहेत.

अजित पवार यांच्या हस्ते आज पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सचिन शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. तेव्हा बोलताना पवार म्हणाले कि, “आज राज्यात महिना उलटून गेला तरीही कोणत्याही जिल्ह्यांना पालकमंत्री मिळत नाहीत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना खातेवाटप कधी हा प्रश्न केला की ते फक्त लवकरच इतकी प्रतिक्रिया देतात. राज्यात अनेक अडचणी आणि प्रश्न आहेत यावर निर्णय कोण घेणार? दिल्लीतून जोवर सिग्नल मिळत नाही तोवर यांच्या हातून काहीही घडणार नाही.कोणीही ताम्रपट घेऊन जन्माला आलेले नाही. सत्ता येते आणि जाते. राज्यात आताही सत्तेत बसलेले सत्तेवर किती काळ राहतील हे सांगता येत नाही.”, असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला.

पुढे बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना काही सूचनाही केल्या. “कोणत्याही अडचणीत काम करण्याची जिद्द बाळगा. संकटे कितीही आली, आव्हान कितीही आले तरी त्यावर निर्धाराने सामना करण्याची महाराष्ट्राची परंपरा आपण जपायची आहे. पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता कुठेही कमी पडणार नाही याचा विचार सर्वांनी करायला हवा.”, असं अजित पवार कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!