🕒 1 min read
पिंपरी : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात येऊन आता जवळपास १ महिना होऊन गेला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांच्याही सध्या दिल्ली वाऱ्या सुरु आहेत. मात्र अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. यावरून विरोधक वारंवार सरकारवर टीका करत आहेत. यातच आता मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्याच्या सचिवांना अधिकार देण्याचा आदेश काढल्यामुळे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.
अजित पवार म्हणाले की, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या सचिवांना अधिकार देण्याचे आदेश काढले आहेत. हे आदेश ४ ऑगस्ट रोजीचे आहेत. आता जिल्हा परिषदा आणि महापालिकांच्या मुदती संपल्या आहेत. कोर्टाने सांगितंलय निवडणुका घ्या. मात्र इथं निवडणुका होऊ दिल्या जात नाहीयेत. पुणे महापालिका, पुणे जिल्हा परिषद आणि पिंपरी महानगरपालिकेत जागा वाढल्या होत्या. मात्र त्या देखील कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तुम्हा दोघांनाच फक्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व्हायचंय. बाकीच्यांना प्रतिनिधीत्व द्यायच नाही अन् सर्व अधिकार सचिवांना द्यायचे, असं कसं जमणार?”
दिल्लीतून सिग्नल मिळत नाही तोवर…
“आज राज्यात महिना उलटून गेला तरीही कोणत्याही जिल्ह्यांना पालकमंत्री मिळत नाहीत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना खातेवाटप कधी हा प्रश्न केला की ते फक्त लवकरच इतकी प्रतिक्रिया देतात. राज्यात अनेक अडचणी आणि प्रश्न आहेत यावर निर्णय कोण घेणार? दिल्लीतून जोवर सिग्नल मिळत नाही तोवर यांच्या हातून काहीही घडणार नाही. कोणीही ताम्रपट घेऊन जन्माला आलेले नाही. सत्ता येते आणि जाते. राज्यात आताही सत्तेत बसलेले सत्तेवर किती काळ राहतील हे सांगता येत नाही.”, असा टोला देखील अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Ajit pawar | “दिल्लीतून सिग्नल मिळत नाही तोपर्यंत…”; मंत्रिमंडळ विस्तारावरुन अजित पवारांचा इशारा
- BJP। मुख्यमंत्री साहेब दीपक केसरकरांना आवरा, आमच्या नेत्यांनी काय कारवं हे त्यांनी सांगू नये; भाजपाचा इशारा
- Deepika Padukone | “… तेव्हा सतत आत्महत्येचे विचार यायचे”; दीपिकाने सांगितली डिप्रेशनची कहाणी
- Bhandara | महाराष्ट्र हादरला; महिलेवर सामूहिक बलात्कार, रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात अन् विवस्त्र आढळली
- Corona | सण समारंभाच्या काळात कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय; खबरदारी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
