Ajit Pawar। पुणे : राज्यात शिंदे सरकार अस्तित्वात येऊन आता जवळपास १ महिना होऊन गेला. मात्र अद्याप मंत्रिमंडळ विस्तार नाही. यावरून विरोधक वारंवार सरकारवर टीका करत असतात. तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांच्याही सध्या दिल्ली वाऱ्या सुरु आहेत. याआधी अनेकवेळा मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भाकीत केली जात होती. मात्र अजूनही मंत्रिमंडळ विस्तार राखडलेलाच आहे. त्यातच आता विरोधी पक्षनेते अजित पवार हे यावरून वारंवार सरकारला जाब विचारत धारेवर धरलं आहे.
अजित पवार आज पुण्यात आले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले कि, राज्यात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन तब्बल 36 दिवस उलटले, तरी अजून मंत्रिमंडळ विस्ताराचा पत्ता नाहीये. एकनाथ शिंदे सोबत आलेल्या चाळीस आमदारांना जर मंत्रीपदाची गाजर दाखवले असतील तर आता ऐनवेळी अडचण होणारच ना. मंत्रिमंडळ विस्तार लांबल्याने लोकांचे कामं रखडली आहेत. तसेच अधिवेशनही रखडलं आहे, जर तुमच्याकडे बहुमताचा आकडा आहे तर मंत्रिमंडळ विस्तार करायला का घाबरताय?, अशी घनाघाती सवाल करत अजित पवारांनी टीका केली आहे.
दरम्यान, आज सकाळी मंत्रिमंडळाच्या मुद्द्यावरून बोलताना अजित पवार म्हणाले होते कि, आम्ही आरोप करत नाही. वस्तुस्थिती आहे. शपथविधी होऊन 35 दिवसांपेक्षा जास्त दिवस झालेत. तरी मंत्रिमंडळ विस्तार होत नाही. मुखमंत्र्यांनी लवकर करू लवकर करू, हे सांगायचे बंद करावे, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली होती. ते पुण्यात बोलत होते. अजित पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सोमवार पेठेतील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी आले होते.
यानंतर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधत राज्य सरकारवर टीका केली. पुणेकरांनी पाच वर्षे भाजपाचा कारभार पाहिला आहे. मीही अडीच वर्षे पालकमंत्री होतो. मी आपले पुणे, आपला जिल्हा म्हणून काय केले हे पुणेकरांनी पाहिले आहे. उद्याची 50 वर्षे डोळ्यासमोर ठेऊन पुण्याचे नियोजन केले. मात्र आता तर महिना झाला तरी पालकमंत्री नाही, मंत्रिमंडळ नाही, असे ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Ajit pawar | “दिल्लीतून सिग्नल मिळत नाही तोपर्यंत…”; मंत्रिमंडळ विस्तारावरुन अजित पवारांचा इशारा
- BJP। मुख्यमंत्री साहेब दीपक केसरकरांना आवरा, आमच्या नेत्यांनी काय कारवं हे त्यांनी सांगू नये; भाजपाचा इशारा
- Deepika Padukone | “… तेव्हा सतत आत्महत्येचे विचार यायचे”; दीपिकाने सांगितली डिप्रेशनची कहाणी
- Bhandara | महाराष्ट्र हादरला; महिलेवर सामूहिक बलात्कार, रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात अन् विवस्त्र आढळली
- Corona | सण समारंभाच्या काळात कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय; खबरदारी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन


