अकोला: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्वर ओक’ या निवासस्थानाबाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी काल (८ एप्रिल) जोरदार आंदोलन केले. यानंतर राष्ट्रवादीकडून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. आता राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी थेट गुणरत्न सदावर्ते यांना निशाण्यावर धरले आहे.
“लोकनेते शरदचंद्रजी पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्वर ओक येथे गुणरत्न सदावर्ते या भाजपच्या दलालाच्या नादाला लागून काही गुंड प्रवृत्तीच्या जमावानी जो भ्याड हल्ला केला त्या हल्ल्याचा अकोला महानगरच्या राष्ट्रवादीच्या वतीने निषेध व्यक्त केला. सदावर्तेमुळे महाराष्ट्राच्या सुसंस्कृतपणाला हरताळ फासण्याचा प्रयत्न झाला आहे. यामागील मास्टरमाइंड शांत बसून आसुरी आनंद घेत आहेत. विरोधी पक्षाचे नेते साधा शब्दही काढायला तयार नाहीत. जे चाललंय ते खरच खुप भयंकर आहे. हिटलरच्या दलालांना याची किंमत मोजावीच लागेल.”, असा इशारा अमोल मिटकरी यांनी दिला आहे.
तसेच सिल्वर ओकवर काही मुठभर लोकांना हाताशी धरून आक्रमण करू पाहणाऱ्या वर्गाचा मास्टर माईंड शोधणे गरजेचे आहे. यामागे नेमका कोण ? कोर्टात वकिली करणारा? शेतकऱ्यांच्या जीवावर उदार झालेला? की मंगळसुत्र चोर? चिथावणी खोरास जशास तसे उत्तर देण्याची गरज आहे. असे मिटकरी यांनी ट्वीट करत म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
IPL 2022: ‘अप्रतिम ,अविश्वसनीय, अद्भुत’; GT vs PKBS सामन्यात घोंगावलं तेवतीया नावाचं वादळ!
IPL 2022: लिविंगस्टोनची दमदार बॅटिंग आणि राशीद खानची फिरकी; गुजरात पुढे १९० धावांचे लक्ष्य!
OBC राजकीय आरक्षण कायद्याला मराठा नेत्याचा विरोध; सर्वोच्च न्यायालयात दाखल केली याचिका
“टोकाची भूमिका घेण्याची परिस्थितीच आत्महत्त्यांना जबाबदार”- शरद पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

