🕒 1 min read
मुंबई: आयपीएलच्या १६ व्या सामन्यात आज हार्दिकच्या गुजरात टायटन्सचा सामना मयंक अग्रवालचा (mayank agrawal) पंजाब किंग्ज (GT vs PBKS) सुरु आहे. गुजरातने प्रथम नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला उतरलेल्या पंजाब संघाने धावा केल्या. एकावेळी पंजाब सहज २०० पार करेल अशी स्थिती असताना गुजरातकडून पर्दापण करण्याऱ्या दर्शन नलावडे आणि अनुभवी राशीदने पंजाबची गाडी थांबवली. पंजाबने २० षटकात ९ बाद १८९ धावा केल्या.
प्रथम फलंदाजीला उतरलेल्या पंजाबची (PBKS) सुरुवात चांगली झाली. मात्र ५व्या ओव्हरमध्ये जॉनी बेअरस्टोची(Jhonny bairstow) विकेट पडताच पंजाबची खेळी डळमळतांना दिसली. सलामीला उतरलेल्या शिखर धवनने एका बाजूने धावा करणे सुरु ठेवले मात्र तो ही राशीदच्या जाळ्यात अडकला. शिखर बाद झाल्यानंतर या हंगामात पंजाबसाठी स्टार परफॉर्मर राहिलेल्या लियाम लिविंगस्टोनने (liam livingstone) पंजाबला तारले.
लियामने पंजाबसाठी २७ चेंडूत धमाकेदार ६४ धावांची खेळी केली. ज्यात ७ चौकार ४ षटकारांचा समावेश होता. शाहरुख आणि लियाम संघाला २०० पर्यंत नेतील त्याआधीच राशीदच्या (rashid khan) फिरकीने त्यांना गारद केले. त्यानंतर पंजाबची फलंदाजी राहुल चहरने १८० पार नेट गुजरातपुढे १९० चे लक्ष्य ठेवले. गुजरातच्या गोलंदाजीने पुन्हा एकदा कमाल दाखवली आहे. आता गुजरात स्पर्धेतील ४था सामना जिंकण्यासाठी मैदानावर उतरेल.
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
महत्वाच्या बातम्या
- OBC राजकीय आरक्षण कायद्याला मराठा नेत्याचा विरोध; सर्वोच्च न्यायालयात दाखल केली याचिका
- “टोकाची भूमिका घेण्याची परिस्थितीच आत्महत्त्यांना जबाबदार”- शरद पवार
- ‘भारताचा पुढचा पंतप्रधान शीख किंवा मराठा बनणार’; गुप्तचर संस्था राॅच्या माजी प्रमुखांचे विधान
- “भाजपच नाव घेतल्याशिवाय राष्ट्रवादीचं राजकरण पूर्ण होत नाही का?”- चित्रा वाघ
- एसटी कामगार आंदोलनावर सदावर्तेंची पहिली प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
