Share

IPL 2022: ‘अप्रतिम ,अविश्वसनीय, अद्भुत’; GT vs PKBS सामन्यात घोंगावलं तेवतीया नावाचं वादळ!

Published On: 

मुंबई: १५ व्या हंगामातील १६ वा सामना मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर नवीन IPL संघ गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला गेला. या सामन्यात (GT vs PKBS), हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील संघ गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता पंजाबने दिलेल्या १९० धावांचा पाठलाग करताना गुजरातच्या खेळाडूंनी संघाला रोमहर्षक रित्या विजय मिळवून दिला आहे.

नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाब किंग्जची सुरुवात खराब झाली. खराब सुरुवातीनंतरही पंजाब किंग्जने लियाम लिव्हिंगस्टोनच्या दमदार खेळीमुळे गुजरात टायटन्सला १९० धावांचे डोंगराएवढे लक्ष्य दिले. दुसरीकडे शुबमन गिलने (shubman gill) गुजरात टायटन्सला चांगली सुरुवात करून दिली. गुजरात टायटन्सकडून गिलने ५९ बॉल्समध्ये ९६ रन्सची इनिंग खेळली. शुबमननंतर दुसरा विजयाचा शिलेदार तेवतीया (Rahul tewtia) ठरला.

राहुल तेवतियाने शेवटच्या २०व्या षटकात आर या पारच्या लढाईत संघासाठी हा सामना जिंकला. शेवटच्या षटकात फलंदाजीला आलेल्या तेवतीयाने ३ चेंडूत १३ धावा केल्या. ज्यात शेवटच्या दोन चेंडूत १२ धावा गरजेच्या असताना त्याने आश्चर्यकारकरित्या दोन षटकार लगावले आणि विजय निश्चित केला. तेवतीयाचे क्रिकेट रसिक हैराण प्रभावित झालेले दिसले. शेवटच्या चेंडूपर्यंत निर्णय अनिश्चित असताना त्याची फिनशर म्हणून कामगिरी अतुलनीय ठरली. इतिहासात शेवटच्या दोन चेंडूत षटकार लगावत सामना जिंकून देणारा तिसरा खेळाडू ठरला.

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!