Share

IPL 2022: शुबमन- हार्दिक- तेवतीयाच्या धडाकेबाज खेळीने पंजाबचे गोलंदाज परास्त; ६ विकेट्सने दणदणीत विजय!

Published On: 

मुंबई: आयपीएलच्या १६ व्या सामन्यात आज हार्दिकच्या गुजरात टायटन्सचा सामना मयंक अग्रवालचा (mayank agrawal) पंजाब किंग्ज (GT vs PBKS) यांच्यात सामना खेळला गेला. गुजरातने प्रथम नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला उतरलेल्या पंजाब संघाने १८९ धावा केल्या. पंजाबच्या १९० धावांचा पाठलाग करताना झालेल्या या रोमहर्षक सामन्यात गुजरातच्या तेवतीयाने शेवटच्या दोन चेंडूत दोन षटकार लगावत संघाला विजय मिळवून दिला आहे.

प्रथम फलंदाजीला उतरलेल्या पंजाबची सुरुवात चांगली झाली. मात्र ५व्या ओव्हरमध्ये जॉनी बेअरस्टोची विकेट पडताच पंजाबची खेळी डळमळतांना दिसली. सलामीला उतरलेला शिखरही बाद झाल्यानंतर या हंगामात पंजाबसाठी स्टार परफॉर्मर राहिलेल्या लियाम लिविंगस्टोनने (Liam livingstone) पंजाबला तारले. लियामने पंजाबसाठी २७ चेंडूत धमाकेदार ६४ धावांची खेळी केली. ज्यात ७ चौकार ४ षटकारांचा समावेश होता.ज्यामुळे पंजाब संघ १८९ पर्यंत पोहचू शकला.

गोलंदाजीत अप्रतिम कामगिरी केल्यानंतर गुजरातच्या फलंदाजांनीही आपली कमाल दाखवली. सलामीला उतरलेल्या शुबमन गिलने(shubman gill) संघाला मजबूत सुरुवात करून दिली. मात्र शतकापासून ४ धावा दूर असताना त्याला माघारी परतावे लागले. गिलने ५९ चेंडूत ९६ धावा केल्या. गिलच्या जोडीला कर्णधार हार्दिकनेही दमदार २७ धावांची खेळी केली. गिल नंतर हार्दिकही (hardik pandya) बाद झाल्यावर सामना फसणार दिसत असताना पुन्हा एकदा राहुल तेवतीयाने (rahul tewtia) फिनिशरची भूमिका बजावली. अखेरच्या दोन चेंडूत १२ धावा बाकी असताना त्याने ओडियन स्मिथच्या दोन्ही चेंडूत षटकार लगावत गुजरातला स्पर्धेतील ४था विजय मिळवून दिला.

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!