मुंबई: बँगलोर आणि राजस्थान यांच्यात झालेल्या सामन्यात बंगळुरूच्या नेत्रदीपक विजयानंतर सामन्याचा हिरो दिनेश कार्तिकला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला. शेवटच्या सामन्यातही जेव्हा RCB संघर्ष करत होता तेव्हा त्याने फिनिशरची चमकदार भूमिका बजावली निभावली होती. ज्यानंतर त्याचे सगळीकडून कौतुक होत आहे.
RCBने दिनेश कार्तिकच्या (Dinesh kartik) धमाकेदार खेळीमुळे राजस्थानला ४ विकेट्सने पराभूत केले. सामना संपल्यानंतर दिनेशच्या कामगिरी बद्दल बोलताना कर्णधार फाफ डू प्लेसिस (faf du plessis) म्हणाला, “हा एक अप्रतिम सामना होता. असा सामना दुसऱ्या संघाच्या जबड्यातून खेचण्यासाठी तुम्हाला दिनेश कार्तिकसारख्या खेळाडूंची गरज आहे, जो अशा क्षणांमध्ये आपली भूमिका बजावू शकेल. समोरच्या खेळाडूंनीही त्याच्यावर दबाव आणू नये म्हणून तो खूप शांत होता.”
संघाच्या एकूण कामगिरीबाबतही फाफने यावेळी भाष्य केले. “आम्हीही चांगली गोलंदाजी केली पण १९व्या षटकात जॉसने चांगली फलंदाजी केली आणि त्यांना सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. आम्हाला पाहिजे तशी सुरुवात झाली नाही. पण, आम्हाला विश्वास होता की आम्ही सामना जिंकू शकतो. शाहबाजचा स्वतःचा गेम प्लॅन होता आणि तो भविष्यातही गोलंदाजीत योगदान देऊ शकतो.”
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
महत्वाच्या बातम्या
- अंशुमन विचारेला एप्रिल फूल पडले महागात, ‘त्या’ पोस्ट वरून पत्नीला मागावी लागली माफी
- “राऊतांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पुरावे द्यावे”; सोमय्यांचे आव्हान
- IPL 2022: कार्तिक नावाचे वादळ अजूनही घोंगावते; ‘मॅन ऑफ द मॅच’ जिंकल्यानंतर म्हणाला ‘अजून संपलेलो नाही…!’
- “जे होईल ते कायद्यानेच तुम्ही खंबीरपणे…”, भातखळकरांचा रोहित पवारांना टोला
- “…तर तुमची संपत्ती देखील मराठी माणसाची असली पाहिजे”, भातखळकरांचा राऊतांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

