नवी दिल्ली: शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी INS विक्रांत प्रकरणी मोठा खुलासा करत भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला आहे. आयएनएस विक्रांतसाठी किरीट सोमय्यांनी कोट्यवधी रुपये जमा केले. त्यासाठी लाखो लोकांनी पैसे दिले. स्वतः किरीट सोमय्यांनी 57 कोटी रुपये जमा केले. पण हे पैसे राजभवनात जमा झालेच नाहीत. असा आरोप राऊत यांनी केला आहे. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधत सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर गंभीर आरोप केले.
विक्रांतशी देशातील नागरिकांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. ते देशाच्या संरक्षण शक्तीचे एक प्रतिक आहे. त्याच्यामध्ये जर घोटाळा होत असेल तर हा देशद्रोह ठरतो. त्यामुळे किरीट सोमय्या यांच्यावर देशद्राहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करत सोमय्या यांनी भावनिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या देशाच्या नावाने गोळा केलेले पैसे यांनी गिळले. आम्ही पुरावा दिल्यावर म्हणता हा कसला पुरावा? लोकं तुला नागडं करून मारतील.. अशा शब्दांत संजय राऊत यांनी सोमय्यांवर टीका केली आहे.
तसेच केंद्रीय तपास यंत्रणा जर खरच निपक्षपाती असतील तर त्यांनी या प्रकरणाचा तपास करावा असे आवाहान करत विक्रांतच्या संवर्धनासाठी कोट्यावधी रुपये जमा करण्यात आले, मात्र ते राजभवनापर्यंत पोहोचलेच नाहीत तर मग हे पैसे गेले कुठे? असा सवालही राऊत यांनी केला आहे. त्यामुळे सोमय्या यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांची सुरक्षाही काढून घेण्यात यावी, अशी मागणी राऊत यांनी थेट केंद्र सरकारकडे केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
“राऊतांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पुरावे द्यावे”; सोमय्यांचे आव्हान
“जे होईल ते कायद्यानेच तुम्ही खंबीरपणे…”, भातखळकरांचा रोहित पवारांना टोला
“…तर तुमची संपत्ती देखील मराठी माणसाची असली पाहिजे”, भातखळकरांचा राऊतांना टोला
“ED ने थेट राष्ट्रवादीच्या भोंग्यावरच…” मनसेने राऊतांना डिवचले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

