Share

सोमय्यांनी ‘विक्रांत’साठी जमवलेला पैसा गेला कुठे ?

Published On: 

मुंबई : महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना, नेत्यांना अडचणीत आणणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आता स्वतःच अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे.

आयएनएस विक्रांत युद्धनौकेला ऐतिहासिक महत्त्व आहे. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये युद्धकाळात तिने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
भारतीय नौदलाची ही आयएनएस विक्रांत भंगारात जाण्याऐवजी त्याचे जतन होऊन संग्रहालय व्हावे, यासाठी २०१३ – १४ मध्ये सोमय्यांनी लोकवर्गणीतून पैसे जमवले होते. मात्र हा निधी नेमका किती याची माहिती नाही. व तो निधी राजभवनापर्यंत पोहचला नसल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. मग हा पैसा नेमका गेला कुठे ? असा प्रश्न निर्माण होत आहे.

यावर संजय राऊत म्हणाले, “हा पैसा राज्यपालांकडे जमा झाला नाही मग नेमका गेला कुठे ? सोमय्यांनी हा पैसा निवडणूकीसाठी वापरले की मुलाच्या कंपनीत गुंतवले.” सोमय्यांनी देशद्रोहाचा गुन्हा केला आहे. राज्यातील तपासयंत्रणांनी या प्रकरणाचा तपास करावा अशी मागणीही राऊतांनी केली.

उपाध्ये नावाच्या एका माहिती अधिकारी कार्यकर्त्याने या निधीची तपशील, माहिती अधिकारात मागितला होता. परंतु हा निधी राजभवनापर्यंत पोहोचलाच नसल्याचे उघड झाले आहे.

महत्वाच्या बातम्या :

अंशुमन विचारेला एप्रिल फूल पडले महागात, ‘त्या’ पोस्ट वरून पत्नीला मागावी लागली माफी
“राऊतांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पुरावे द्यावे”; सोमय्यांचे आव्हान
IPL 2022: कार्तिक नावाचे वादळ अजूनही घोंगावते; ‘मॅन ऑफ द मॅच’ जिंकल्यानंतर म्हणाला ‘अजून संपलेलो नाही…!’
“जे होईल ते कायद्यानेच तुम्ही खंबीरपणे…”, भातखळकरांचा रोहित पवारांना टोला
“…तर तुमची संपत्ती देखील मराठी माणसाची असली पाहिजे”, भातखळकरांचा राऊतांना टोला

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!