Share

“काश्मीर फाईल्स पाहून झाली असेल तर आता INS विक्रांत फाईल पाहा”, राऊतांचा मोदी-शाहांवर निशाणा

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर काल (५ एप्रिल) ईडीने कारवाई केली आहे. त्यांची मुंबई आणि अलिबागमधील मालमत्ता जप्त केली आहे. यानंतर राऊत यांनी थेट INS विक्रांत प्रकरणावरून भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला आहे. आयएनएस विक्रांतसाठी किरीट सोमय्यांनी कोट्यवधी रुपये जमा केले. त्यासाठी लाखो लोकांनी पैसे दिले. स्वतः किरीट सोमय्यांनी 57 कोटी रुपये जमा केले. पण हे पैसे राजभवनात जमा झालेच नाहीत. असा आरोप राऊत यांनी केला आहे. आता त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्यावर निशाणा साधला आहे.

“काश्मीर फाईल्स पाहून झाली असेल तर आता पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनी INS विक्रांत फाईल पाहावी. सोमय्यांनी विक्रांतच्या नावाखाली जमा केलेल्या पैशांचं काय केलं याचं उत्तर भाजपनं द्यावं. केंद्राला जरा तरी लाज असेल तर सोमय्यांची सुरक्षा काढून घ्यावी.”, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ते आज माध्यमांशी संवाद साधत होते. मोदी शाहा यांच्यासोबतच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही काश्मीर फाईल्स पाहून झाली असेल तर एकदा INS विक्रांत फाईल पहावी, असेही राऊत यांनी म्हटले आहे.

दरम्यान संजय राऊतांच्या आरोपाला किरीट सोमय्या यांनी उत्तर दिले. “ईडीच्या कारवाईमुळे संजय राऊत गोंधळलेले आहेत. मी काही केले असेल, तर त्याचे पुरावे संजय राऊतांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना द्यावे. त्यांनी अनेक आरोप केले. पण त्यांना पुरावे मिळालेच नाहीत. ते फक्त टाइमपास करू इच्छितात.”, असे सोमय्या यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या:

“राऊतांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पुरावे द्यावे”; सोमय्यांचे आव्हान

IPL 2022: कार्तिक नावाचे वादळ अजूनही घोंगावते; ‘मॅन ऑफ द मॅच’ जिंकल्यानंतर म्हणाला ‘अजून संपलेलो नाही…!’

“जे होईल ते कायद्यानेच तुम्ही खंबीरपणे…”, भातखळकरांचा रोहित पवारांना टोला

“…तर तुमची संपत्ती देखील मराठी माणसाची असली पाहिजे”, भातखळकरांचा राऊतांना टोला

“ED ने थेट राष्ट्रवादीच्या भोंग्यावरच…” मनसेने राऊतांना डिवचले

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!