Share

Amol mitkari | “मंत्रिपदासाठी रवी राणांना ‘देवेंद्र चालीसा’ वाचण्याची गरज”; मिटकरींचा खोचक टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सुमारे दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर अखेर महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. शिंदे सरकारचा पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला आहे. शिंदे गटातील आणि भाजपातील एकूण १८ आमदार मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यात एकाही अपक्ष आमदाराला आणि महिला आमदाराला स्थान देण्यात आले नाही. तसेच मंत्रिपदाच्या आशेवर असलेल्या शिंदे गटातील अनेक आमदारांची मंत्रपदी वर्णी लागलेली नाही. तर दुसरीकडे भाजपच्या बड्या नेत्यांनाही अद्याप मंत्रिपद मिळालेले नाही. यावरूनच राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी अपक्ष आमदार रवी राणा यांना डिवचले आहे.

आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी महाविकास आघाडीचे सरकार असताना हनुमान चालीसा पठणावरून अनेक वेळा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आव्हान दिले. राज्यातील सामाजिक वातावरण तापवले होते. त्यांनी तेव्हा घेतलेल्या भूमिका या भाजपच्या समर्थनार्थ घेतल्या असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळेच भाजप रवी राणांना मंत्रिपद देईल अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही. मंत्रिमंडळात रवी राणांचा समावेश अद्याप करण्यात आलेला नाही. यावरच मिटकरी यांनी ट्विट केले कि, “हिंदुत्वासाठी जीवाचं रान करणारे रवी राणा, हनुमान चालीसा खिशात घालुन फिरणारे रवी राणा आता अखेर वैफल्यग्रस्त झालेत. देवेंद्र फडणवीस ठरवतील त्यांना मंत्री पद मिळतं याचा अर्थ त्यांना नव्याने ‘देवेंद्र चालीसा’ वाचण्याची गरज आहे. रवीराणा यांना धर्म रक्षणार्थ मंत्रिपद मिळालेच पाहिजे.”, असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.

नागोबा आता शांत का?
तसेच यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. मिटकरी म्हणालेत कि, “अहमदाबाद बुलेट ट्रेन आणि आरे कारशेडच्या फाईल श्री फडणवीसांनी लगेच पास केल्या. पण ज्या एसटी महामंडळ कामगारांचा राजकारणासाठी वापर केला. त्यांच्या विलीनीकरणाचा सोयीने विसर पडला! एसटी कर्मचाऱ्यांच्या साधेपणाचा फायदा घेऊन आकांडतांडव करणारे “नागोबा” आता शांत का आहेत?”, असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!