Share

Sanjay Shirsat | उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ ट्वीट करत संजय शिरसाट यांचा एकनाथ शिंदेंना इशारा!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : उद्धव ठाकरेंविरुद्धची राजकीय लढाई एकनाथ शिंदे यांनी जिंकली असली तरी भाजपशी झालेल्या समझोत्यात ते पराभूत होताना दिसत आहेत. मंगळवारी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून १८ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यातील 9 मंत्री भाजपचे आहेत, तर तेवढेच मंत्री एकनाथ शिंदे गटाचे आहेत. आतापर्यंत या मंत्र्यांना खात्यांचे वाटप झालेले नाही, हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. मात्र, मंत्रिपदावरून शिंदे गटात चांगलीच नाराजी आहे. बच्चू कडू नंतर आमदार संजय शिरसाट नाराज आहेत. संजय शिरसाट यांनी थेट एकनाथ शिंदे यांना इशारा दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा जुना व्हीडीओ ट्वीट करत त्यांनी ‘उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख’, असा उल्लेख केला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपने बहुतांश महत्त्वाची मंत्रीपदे स्वत:कडे ठेवली आहेत. एकनाथ शिंदे समर्थक आमदारांना उद्धव ठाकरे सरकारमध्ये जशी मंत्रिपदं मिळत होती तशीच मंत्रिपदं मिळणार असल्याचं बोललं जात आहे. याशिवाय भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या हाती महत्त्वाची मंत्रिपदं जाऊ शकतात. मात्र शिंदे गटात बंड केलेले आमदार मंत्रिपदाची अपेक्षा ठेवत आहेत. बंडादरम्यान थेट उद्धव ठाकरे यांना सवाल करणारे आमदार संजय शिरसाट यांना पहिल्या टप्प्यात मंत्रिपद मिळाले नाही.

तर एकाच विभागात ४ मंत्रिपदे होतील-

शिंदे फडणवीस सरकारने औरंदाबाद विभागात सध्या तीन मंत्रिपदे दिले आहेत. त्यामुळे संजय शिरसाट यांना मंत्रिपद न देण्याची चर्चा आहे. शिरसाट यांना मंत्रिपद दिले तर एकाच विभागात ४ मंत्रिपदे होतील.

ट्वीट काय केले?

संजय शिरसाट यांनी शुक्रवारी रात्री उद्धव ठाकरेंचा एक जुना व्हिडिओ ट्वीट केला आहे. यामध्ये ‘उद्धव ठाकरे’ यांचा महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख असा उल्लेख करण्यात आला होता. एवढेच नव्हे तर, शिरसाट यांनी ट्वीट सोबत विधानसभेतील उद्धव ठाकरेंचे एक भाषण देखील जोडलं होते. मात्र, काही वेळाने त्यांनी हे ट्वीट डिलिट केले.

संजय शिरसाट यांचे स्पष्टीकरण –

उद्धव ठाकरे यांच्या बाबतचे ट्वीट तांत्रिक अडचणीमुळे झाले होते. चूक लक्षात येताच आम्ही ट्वीट डिलीट केले, असे संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले. शिरसाट म्हणाले, मला मंत्रिपदाबाबत आश्वासन देण्यात आले होते. पण मला कॉम्प्रमाईज करावं लागलं. मी कॅबीनेट आणि पालकमंत्री पद मागितलं आहे. अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील .

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!