🕒 1 min read
औरंगाबाद : उद्धव ठाकरेंविरुद्धची राजकीय लढाई एकनाथ शिंदे यांनी जिंकली असली तरी भाजपशी झालेल्या समझोत्यात ते पराभूत होताना दिसत आहेत. मंगळवारी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून १८ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यातील ९ मंत्री भाजपचे आहेत, तर तेवढेच मंत्री एकनाथ शिंदे गटाचे आहेत. आतापर्यंत या मंत्र्यांना खात्यांचे वाटप झालेले नाही, हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. मात्र, मंत्रिपदावरून शिंदे गटात चांगलीच नाराजी आहे. बच्चू कडू नंतर आमदार संजय शिरसाट नाराज आहेत. संजय शिरसाट यांनी थेट एकनाथ शिंदे यांना इशारा दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा जूना व्हीडीओ ट्वीट करत त्यांनी उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख असा उल्लेख केला आहे.
संजय शिरसाट यांनी शुक्रवारी रात्री उद्धव ठाकरेंचा एक जुना व्हिडिओ ट्वीट केला आहे. यामध्ये ‘उद्धव ठाकरे’ यांचा महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख असा उल्लेख करण्यात आला होता. एवढेच नव्हे तर, शिरसाट यांनी ट्वीट सोबत विधानसभेतील उद्धव ठाकरेंचे एक भाषण देखील जोडलं होते. मात्र, काही वेळाने त्यांनी हे ट्वीट डिलिट केले.

संजय शिरसाट यांचे स्पष्टीकरण –
उद्धव ठाकरे यांच्या बाबतचे ट्वीट तांत्रिक अडचणीमुळे झाले होते. चूक लक्षात येताच आम्ही ट्वीट डिलीट केले, असे संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले. शिरसाट म्हणाले, “मला मंत्रिपदाबाबत आश्वासन देण्यात आले होते. पण मला कॉम्प्रमाईज करावं लागलं. मी कॅबीनेट आणि पालकमंत्री पद मागितलं आहे. अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील. मी एकनाथ शिंदेंसोबत होतो, आहे आणि त्यांच्याच सोबत राहणार आहे.”
महत्वाच्या बातम्या :
- Sanjay Shirsat | उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ ट्वीट करत संजय शिरसाट यांचा एकनाथ शिंदेंना इशारा!
- Salman Rushdie stabbed : लेखक सलमान रश्दी यांच्यावर भर कार्यक्रमात जिवघेणा चाकू हल्ला, हल्लेखोरांना अटक!
- Pankaja Munde to Akshay Kumar | पंकजा मुंडेंचे ‘ते’ एक ट्वीट अण् आला अक्षय कुमारचा रिप्लाय ! जाणून घ्या प्रकरण…
- Ambadas danve | गद्दारांना धडा शिकवण्यासाठी मविआने एकत्र येण्याची गरज – अंबासाहेब दानवे
- Sudhir Mungantiwar | पंकजा मुंडे यांच्या नाराजीवर सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
