मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या समर्थनासाठी शिवसेना पक्षातील आमदार त्यांच्यासोबत गेले आणि राज्यात शिंदे यांचं सरकार स्थापन झालं. तेव्हापासून शिंदे गट आणि ठाकरे गट असे गट पडले आहे. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाची खेळत असतात. अशातच पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेचे नेते आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
गुलाबराव पाटील यांचे वक्तव्य-
32 वर्षांचा पोरगा उठतो आणि आमच्यावर टीका करतो. अरे बाबा तुम्ही गोधडीतही नव्हता तेव्हापासून आम्ही शिवसेनेत आहोत, असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. गुलाबराव पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. अली बाबा और उसके चालीस चोर थे, तसं आम्हीही शिंदे बाबा के चालीस आमदार आहोत, असंही ते म्हणाले आहेत.
आम्ही शिंदे बाबा के चालीस आमदार आहोत-
लोक म्हणतात शिवसेनेतून बाहेर पडल्यावर तेरा क्या होगा कालिया? यावर त्यांनी उत्तर दिलं की, आमचा गब्बर आहे. मी गुवाहाटी गेलो. तेव्हा पत्नी-मुलांचे फोन आले की परत या. पण आता परत येत नाही असं मी त्यांना ठणकावून सांगितलं. ज्याप्रमाणे अली बाबा के चालीस चोर थे तसं आम्ही शिंदे बाबा के चालीस आमदार आहोत, या शब्दात इतिहास लिहिला जाईल, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.
तसेच, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे मी गेलो होतो. त्यांना सांगितलं की, गेलेल्या आमदारांना परत बोलवा. असं केलं असतं तर सरकार वाचू शकलं असतं. मात्र त्यावेळी त्यांनी उडाले ते कावळे, राहिले ते मावळे अशी भाषा वापरली होती. त्यांनी वापरलेली भाषा पटणारं नव्हती, असंही त्यांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या :
- Shivsena । मेल्या आईचे दूध प्यायलेले नाहीत याचे भान राखा; शिवसेनेचा भाजपाला इशारा
- Mumbai : गृहमंत्री अमित शहा मुंबईत दाखल, आज ठरणार का BMC निवडणूकीची रणनीती..!
- Ambadas Danve | शिवसैनिकांना शोधून मारणारा अजून जन्माला यायचाय; दानवेंचं गायकवाडांना प्रत्युत्तर
- IND vs PAK । “बाबर आझमने या क्रमांकावर फलंदाजी केली, तर भारताविरुद्ध… “; सामन्यापूर्वीच माजी खेळाडूच मोठे विधान
- Cyrus Mistry Death । टाटा ग्रुपचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांचा पालघरमधील रस्ते अपघातात मृत्यू

