🕒 1 min read
मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत हे गोरेगावच्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटकेत आहेत. यादरम्यान त्यांच्या अडचणीत अजून वाढ झाली आहे. संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्यांची न्यायालयीन मुदत संपत असल्याने संजय राऊत यांना आज न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी न्यायालयाने त्यांच्या कोठडी मध्ये 19 सप्टेंबर पर्यंत वाढ केली आहे.
1034 कोटींच्या पत्रा चाळ घोटाळ्यातील आरोपी संजय राऊत न्यायालयीन कोठडीत आहे. तुरुंगाच्या कोठडीत संजय राऊत यांची रोजचा दिनक्रम समोर आला होता. तुरुंगात संजय राऊत आपला जास्तीत जास्त वेळ अभ्यास आणि लेखनात घालवतात. त्यांना कोणत्याही प्रकारची व्हीआयपी वागणूक देण्यात आलेली नाही. शिवसेना खासदार संजय राऊत सध्या मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात आहेत. कैदी क्रमांक 8959 अशी त्यांची ओळख आहे
राऊतांच्या विरोधातील काही पुरावे सापडल्याने त्यांचा जामीन मंजूर केला नसल्याची माहिती समोर आली आहे. मात्र यामुळे राऊतांच्या अडचणीत आणखी वाढ होणार हे स्पष्ट आहे.
दरम्यान, संजय राऊत यांना सामान्य नियमांनुसार इतर कैद्यांना ज्या सुविधा दिल्या जातात त्याच सुविधा देण्यात आल्या आहेत. त्यांना लिहिण्यासाठी पेन आणि रजिस्टर देण्यात आले आहेत. मात्र ते लिखाण तुरुंगातून बाहेर जाऊ नये, तसेच कारागृहात काय लिहितात, याची पुरेपूर काळजी कारागृह प्रशासन घेत आहे. लिहिण्याव्यतिरिक्त ते बातम्या वाचतात. इतर कैद्यांप्रमाणे त्यांचा दिनक्रमही नियमांनी बांधलेला असतो.
महत्वाच्या बातम्या :
- Shivsena । मेल्या आईचे दूध प्यायलेले नाहीत याचे भान राखा; शिवसेनेचा भाजपाला इशारा
- Mumbai : गृहमंत्री अमित शहा मुंबईत दाखल, आज ठरणार का BMC निवडणूकीची रणनीती..!
- Ambadas Danve | शिवसैनिकांना शोधून मारणारा अजून जन्माला यायचाय; दानवेंचं गायकवाडांना प्रत्युत्तर
- IND vs PAK । “बाबर आझमने या क्रमांकावर फलंदाजी केली, तर भारताविरुद्ध… “; सामन्यापूर्वीच माजी खेळाडूच मोठे विधान
- Cyrus Mistry Death । टाटा ग्रुपचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांचा पालघरमधील रस्ते अपघातात मृत्यू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
