Share

Gopichand Padalkar | “एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झालेत हे सुप्रिया सुळेंना सहन होईना”

Published On: 

मुंबई : सध्या सगळीकडे गणेशोत्सवाचं वातावरण आहे. राजकीय नेते एकमेकांच्या घरी गणपती दर्शनाला जात आहेत. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचंही नावं येतं. याच मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. अशातच सुप्रिया सुळे यांना भाजप पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी चांगलाच प्रत्युत्तर दिलं आहे.

गोपीचंद पडळकर यांचे वक्तव्य-

गणपतीच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काही लोकांच्या घरी जात आहेत. तर त्याचाही त्यांना त्रास होतोय. वाईट वाटतंय. हे सगळं द्वेषातून होतंय, असं म्हणत गोपीचंद पडळकर यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला आहे. पडळकर यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

सर्वसामान्य माणसाला भाजपने संधी दिली-

सुप्रिया सुळेंचा समज आहे की, त्यांना वाटतं त्यांचे वडीलच केवळ राज्याच्या राजकारणात बदल करु शकतात. असं असताना एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या या समजाला छेद दिला हे त्यांना पटलं नाही. एका सर्वसामान्य माणसाला भाजपने संधी दिली. एकनाथ शिंदेंसारख्या नेत्यांला मुख्यमंत्री केल्याचं सुप्रिया ताईंना पटलं नसल्याचं म्हणत पडळकरांनी सुप्रिया सुळे यांना सडकून टोला लगावला आहे.

दरम्यान, माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी गाठीभेटी आणि होम व्हिजिट सोडून या सरकारच्या फारश्या काही बातम्या दिसत नाहीत. जे दौरे दिसतात ते एक किलोमीटरच्या आतले असतात. मी जेव्हा जेव्हा टीव्ही बघते तेव्हा मला ते कुणाच्या तरी घरीच दिसतात, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता.

महत्वाच्या बातम्या :

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!