मुंबई : एकीकडे शिवसेना आणि शिंदे गटाच्या वादावर अंतिम तोडगा निघालेला नाही. त्यामुळे सत्तांतराचा पेच अजूनही कायम असून, या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. त्यात आगामी काळात राज्यातील मुंबईसह राज्यातील प्रमुख महानगर पालिकांच्या निवडणुकांच बिगुल वाजणार आहे. त्याआधीच विजयाची पताका उंचवण्यासाठी भाजपने हालचाली करण्यास सुरूवात केली केल्यात. तर दुसरीकडे शिवसेना मुखपत्र सामाना मधून भाजप पक्षावर जोरदार निशाणा साधण्यात येत आहे.
सामना अग्रलेखात काय म्हटलं आहे?
अरे सडक्या मेंदूच्या राज्यकर्त्यांनो, तुम्ही गोधडी भिजवत होता तेव्हापासून शिवसेना शिवतीर्थावर दसरा मेळाव्यांचे सीमोल्लंघन करीत आली आहे, असं म्हणत शिवसेना पक्षाने भाजपवर हल्ला केला आहे. आमचे शिवतीर्थ व त्यांचे शिवतीर्थ वेगळे आहे. आम्ही शिवतीर्थी दसरा मेळावा घेऊन विचारांचे सोने लुटू नये, 56 वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुखांनी सुरू केलेली दसरा मेळाव्याची महान परंपरा खंडित व्हावी यासाठी त्यांचे ‘मिशन’ सुरू आहे. काय तर म्हणे शिवतीर्थावर दसरा मेळावा कोणी घ्यायचा याचा निर्णय मुख्यमंत्री शिंदे घेतील, असे ‘कमळाबाई’ मानभावीपणे सांगते, असंही सामनामध्ये म्हटलं आहे.
शिवसेना पक्षाचा भाजप पक्षावर हल्लाबोल-
शिवसेनेशी समोरून दोन हात करता येत नाहीत. मग फोडा–झोडा–मजा पहा. आपापसात झुंज लावा ही ब्रिटिश नीती अवलंबली जात आहे. शिवतीर्थावरच दोन तट पाडून कमळाबाईचा भाजप आज आनंदाने नाचत आहे, पण ते स्वप्नरंजनात दंग आहेत. मराठी माणूस आपसात लढवला जात आहे. कमळाबाईचे हेच तर मिशन होते. ज्यांचे पक्ष कमिशनखोरीच्या मलिद्यावर तरारले आहेत त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार?, अशी टीकाही भाजपवर करण्यात आली आहे.
तसेच, पण हे राज्य शिवरायांचे आहे. येथे बाळासाहेब ठाकरे यांनी स्वाभिमानी मर्द मावळे घडवले, ते मेल्या आईचे दूध प्यायलेले नाहीत याचे भान राखा. बाकी सारे शिवतीर्थावरच, असा इशाराही शिवसेनेने भाजपला दिला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Shivsena । मेल्या आईचे दूध प्यायलेले नाहीत याचे भान राखा; शिवसेनेचा भाजपाला इशारा
- Mumbai : गृहमंत्री अमित शहा मुंबईत दाखल, आज ठरणार का BMC निवडणूकीची रणनीती..!
- Ambadas Danve | शिवसैनिकांना शोधून मारणारा अजून जन्माला यायचाय; दानवेंचं गायकवाडांना प्रत्युत्तर
- IND vs PAK । “बाबर आझमने या क्रमांकावर फलंदाजी केली, तर भारताविरुद्ध… “; सामन्यापूर्वीच माजी खेळाडूच मोठे विधान
- Cyrus Mistry Death । टाटा ग्रुपचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांचा पालघरमधील रस्ते अपघातात मृत्यू

