टीम महाराष्ट्र देशा : देशात सायबर क्राईमच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. फोन करुन आपल्या बॅंक डिटेल मिळवत अकाऊंट वरिल पैसे चोरण्याच्या घटना आपल्याला सर्रास पाहायला मिळतात. हे चोर एका फोन कॉलने आपल्या बॅंकेच्या खात्यातील जवळपास सर्वच रक्कम एका मिनिटात लुटतात. याचाच प्रत्यय पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना देखील आला असून त्यांच्या पत्नीलाच बॅंकेचा अधिकारी बनुन कॉल करत एका भामट्याने 23 लाखांचा चुना लावला आहे.
पंजाबच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी खासदार कौर या दिल्ली येथे लोकसभेच्या कामकाजात सहभागी होण्याकरिता जात होत्या. त्यामुळे त्या घाईत असताना मॅनेजरचा फोन असल्याचे समजून त्यांनी आपली सर्व माहिती कॉल करणाऱ्या भामट्याला दिली होती.
यानंतर काहीच वेळात त्यांना त्यांच्या बॅंक अकाऊंट मधून 23 लाख रुपयांची चोरी झाल्याचा मॅसेज आला. यानंतर त्यांना लुटले गेल्याचे समजले. यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. सदर प्रकरणी बुधवारी पोलिसांनी एका संशयीत व्यक्तीला रांची येथून अटक करण्यात आले असल्याचे सांगितले आहे.
Bank Chor Movie- ‘बॅंक चोर’चा ट्रेलर रिलीज
प्रेक्षकांची मन जिंकत माधवची बिग बॉसमध्ये यशस्वी घोडदौड
ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये देशाच्या बहुतांश भागांमध्ये शंभर टक्के होणार पाऊस : हवामान विभाग
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

