Share

ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये देशाच्या बहुतांश भागांमध्ये शंभर टक्के होणार पाऊस : हवामान विभाग

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा- मान्सूनच्या उत्तरार्धात ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यांमध्ये देशाच्या बहुतांश भागांमध्ये शंभर टक्के पाऊस होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. काल दिल्लीतून मान्सूनच्या उत्तरार्धाचा अंदाज जाहीर करण्यात आला. या अंदाजात ८ टक्के कमी अधिक तफावत होण्याची शक्यता असल्याचं विभागानं म्हटलं आहे. ऑगस्ट महिन्यात ९९ टक्के पाऊस होण्याची शक्यता विभागानं व्यक्त केली आहे.

औरंगाबाद जिल्ह्याच्या पैठण इथल्या जायकवाडी धरणाची पाणी पातळी आठ टक्क्यांवर पोहोचली आहे. धरण क्षेत्रात ४० हजार दसलक्ष घनफूट प्रतिसेकंद क्षमतेनं पाणी दाखल होत आहे. नाशिक जिल्ह्यातल्या नागमठाण, गंगापूर, वलवडी, दारणा, पालखेड आणि कडवा धरणातून हे पाणी येत आहे, असं जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितलं.

एका बाजूला हवामान विभागाने हा दावा केला असला तरीही लातूर जिल्ह्यात आतापर्यंत खूप कमी पाऊस झाला असून जिल्ह्यात भीषण टंचाईची परिस्थिती आहे. जिल्हा प्रशासनामार्फत यावरील सर्व उपाययोजना प्रभावीपणे राबवल्या जात असून प्रशासन या कालावधीत लोकांच्या सोबत असल्याचं लातूरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी म्हटल आहे. ते विस्तारित समाधान योजनेंतर्गत संपर्क, संवाद आणि समाधान अभियानांतर्गत जिल्ह्यातल्या तांदुळजा इथं बोलत होते. या टंचाईच्या काळात ग्रामस्थांनी खचून न जाता धीर धरावा असं आवाहनही लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केलं.

महत्वाच्या बातम्या 

…म्हणून मी भाजपात आलो, शिवेंद्रराजेंनी दिले पक्षांतराचे स्पष्टीकरण

उजनी धरणातील मासे खाताना सावधानता बाळगण्याचा अजितदादांचा सल्ला

जाणून घ्या राज्यातील पावसाची स्थिती फक्त एका क्लिकवर

हवामान खात्याचा अंदाज; सरासरीच्या 97 टक्के पाऊस पडणार

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!