Share

यशवंत जाधवांच्या डायरी संदर्भात अजित पवारांचे स्पष्टीकरण; म्हणाले, “बरेच जण आपल्या आईला…”

Published On: 

🕒 1 min read

पुणे : शिवसेना नेते यशवंत जाधव (Yashwant Jadhav), त्यांचे सहकारी आणि बीएमसी कंत्राटदार यांच्या निवासस्थानी २५ फेब्रुवारी रोजी आयकर विभागाला काही महत्त्वाचे पुरावे मिळाले होते. तपासात जाधव यांनी केलेल्या कोट्यवधींच्या संशयास्पद नोंदी असलेली डायरीही विभागाला सापडली आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, डायरीतील एका नोंदीमध्ये मातोश्रीला ५० लाख रुपयांचे घड्याळ पाठवल्याचा उल्लेख आहे आणि दुसऱ्या नोंदीमध्ये गुढीपाडव्याला मातोश्रीला २ कोटी रुपयांची भेट पाठवल्याचा उल्लेख आहे. या मुद्द्यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे बघायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी या डायरी संदर्भात स्पष्टीकरण दिले आहे.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना अजित पवार म्हणाले की,‘यासंदर्भात विचारण्यात आले असता यशवंत जाधव यांनी मी माझ्या आईला मातोश्री म्हणतो असे उत्तर दिले आहे. बरेच जण स्वतःच्या आईला मातोश्री म्हणतात. ते स्वतः सांगत असताना आपण त्याला अधिक उकळी देण्याचे काम का करत आहात?’, असे पवार म्हणाले.

दरम्यान, यशवंत जाधव यांनी आपल्या डायरीतील ‘मातोश्री’ हा उल्लेख म्हणजे आपली आई असल्याचे म्हटले आहे. आपल्याला दानाची २ कोटी रुपयांची रक्कम मिळाली. याचा वापर मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या भेटवस्तू देण्यासाठी केला. तसेच आईच्या नावावर लोकांना घड्याळांचे वाटप केल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!