मुंबई : वेदांता ग्रुप व फोक्सकॉनचा सेमीकंडक्टर चिप निर्मितीचा प्रकल्प महाराष्ट्र राज्यातून गुजरातला गेला असल्याचं कळताच, महाराष्ट्र राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. परंतू इतक्यातच वेदांता प्रकल्पाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी एक माहिती मोठी घोषणा केली आहे. ते म्हणाले की, आम्ही लवकरच वेदांता-फॉक्सकॉनचा संलग्न प्रकल्प महाराष्ट्र उभारणार आहोत. त्यांनी दिलेल्या माहितीमुळे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनिल अग्रवाल यांचे आभार मानले आहेत.
नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?
वेदांता-फॉक्सकॉनच्या संलग्न प्रकल्पासाठी महाराष्ट्राची निवड करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात फडणवीस यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटरून एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी हे लिहिलं असल्याचं दिसून येतं आहे.
वेदांता-फॉक्सकॉनच्या संलग्न प्रकल्पासाठी महाराष्ट्राची निवड करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार!
महाराष्ट्रात गुंतवणूक यावी यासाठी आम्ही कायमच स्पर्धात्मक आणि व्यवसायपूरक राहू. https://t.co/2X0oGP2ujX— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 14, 2022
पुढे देवेंद्र फडणवी असंही म्हणाले की,महाराष्ट्रात गुंतवणूक यावी यासाठी आम्ही कायमच स्पर्धात्मक आणि व्यवसायपूरक राहू. यासोबतच फडणवीस यांनी अनिल अग्रवाल यांचं ट्विट देखील टाकलं आहे.
अनिल अग्रवाल यांनी आम्ही महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास कटिबद्ध आहोत. आम्ही लवकरच एक हब तयार करू जिथे महाराष्ट्र आमच्या फॉरवर्ड इंटिग्रेशनचा भाग असणार असल्याचं म्हटलं आहे. पुढे अनिल अग्रवाल असंही म्हणाले की, महाराष्ट्र राज्याने या प्रकल्पासाठी भरपूर प्रयत्न केले, परंतू गुजरात सरकारने आमच्या आपेक्षा पूर्ण केल्या असल्याने आम्ही हा प्रकल्प गुजरातमध्ये करत आहोत.
महत्वाच्या बातम्या :
- Supriya Sule । मुख्यमंत्र्यांनी घरगुती दौरे बंद करावेत आणि राज्याच्या विकासासाठी काम करावं; सुप्रिया सुळेंचा सल्ला
- Jayant Patil | विधानसभेतील ‘तो’ व्हिडीओ ट्विट करत जयंत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना सवाल, म्हणाले…
- Ajit Pawar । पहिल्यांदाच ‘अजित पवारांना मुख्यमंत्री करा’, अशी ठाम मागणी, पाहा कुणी केलीय?
- Amit Satam | “वेदांता-फॉक्सकॉन संदर्भात जयंत पाटीलांनी केलेला दावा सपशेल खोटा”
- BCCI। सौरव गांगुली पुन्हा होणार बीसीसीआयचे अध्यक्ष?; सर्वोच्च न्यायालयाने दिला मोठा निर्णय


