Share

Anil Agrawal | “गुजरातची निवड केली असली तरी जुलैमध्ये…”, वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांचं ट्विट

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : वेदांता फॉक्सकॉन ग्रुपचा १ लाख ५४ हजार कोटींचा प्रकल्प गुजरातला गेला. यावरून राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. एवढेच नाही तर सर्वांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धारेवर धरून त्यांच्यामुळेच हा प्रकल्प महाराष्ट्राच्या हातून गेला असल्याचं म्हटलं जातं आहे. अशातच वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी केलेल्या ट्विटमुळे पुन्हा चर्चा रंगु लागली आहे.

अनिल अग्रवाल यांचं ट्विटः

वेदांता-फॉक्सकॉनच्या सेमीकंडक्टर प्रकल्पााठी आम्ही गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र आणि तामिळनाडू या राज्यांचा विचार करत होतो, असं अग्रवाल यांनी म्हटलं आहे. तसेच मागील दोन वर्षांपासून याबाबत राज्य आणि केंद्र सरकारसोबत बैठका सुरू होत्या, मात्र, गुजरातने आमच्या अपेक्षा पूर्ण केल्या म्हणून आम्ही काही महिन्यांपूर्वीच या प्रकल्पासाठी गुजरातचं नाव निश्चित केलं होतं. तरी सुद्धा जुलै महिन्यात महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांसोबत आमची बैठक झाली. या बैठकीत त्यांनीही चांगल्या प्रस्तावासह आम्हाला सहकार्य करण्याची तयारी दर्शवली. परंतु व्यावसायिक सल्ल्यानुसार आम्ही गुजरातची निवड केली, असं अनिल अग्रवाल यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

पाहा ट्विटः

गुजरातमध्ये होत असलेल्या सेमीकंडक्टर प्रकल्पाच्या संलग्न प्रकल्पासाठी महाराष्ट्राचा विचार करू, असं आश्वासन अनिल अग्रवाल यांनी दिलं आहे. अब्जावधी डॉलरची दीर्घकालीन गुंतवणूक भारतीय इलेक्ट्रॉनिक्सची दिशा बदलेल असं म्हणत आम्ही पुढील काळात महाराष्ट्रातही गुंतवणूक करण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध असल्याचं अग्रवालांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, गुजरातमध्ये होत असलेल्या प्रकल्पाच्या संलग्न प्रकल्पाच्या दृष्टीने आमच्यासाठी महाराष्ट्र महत्त्वाचा असेल, असं अग्रवाल म्हणाले.

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!