Share

Breaking | ‘वेदांता फॉक्सकॉनं’ महाराष्ट्रात लवकरच करणार गुतंवणूक – अध्यक्ष अनिल अग्रवाल

Published On: 

नवी दिल्ली : वेदांता ग्रुप व फोक्सकॉनचा सेमीकंडक्टर चिप निर्मितीचा प्रकल्प महाराष्ट्र राज्यातून गुजरातला गेला आहे. या मुद्यावरून राज्यातील वातावरण चांगलंच तापलं असून, राजकीय नेत्यांमध्ये वाद व्हायला लागले आहेत. राजकीय नेते एकमेकांवर आरोप करत आहे. सत्ताधारी पक्षनेते विरोधी पक्षनेत्यांवर, तर विरोधी पक्षनेते सत्ताधारी पक्षनेत्यांवर आरोप करीत आहेत. तर अशातच वेदांता प्रकल्पाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी एक माहिती दिली असल्यचं समजतं आहे.

काय म्हणाले अनिल अग्रवाल ?

आम्ही महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास कटिबद्ध आहोत. आम्ही लवकरच एक हब तयार करू जिथे महाराष्ट्र आमच्या फॉरवर्ड इंटिग्रेशनचा भाग असेल, असं अनिल अग्रवाल यांनी म्हटलं आहे. अनिल अग्रवाल यांनी यासंदर्भात आपल्या ट्विटर आकाऊंटवरून ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी या हे लिहिलं आहे. विरोधकांकडून वेदांत कंपनीवर हल्लाबोल करण्यात आला होता. त्यानंतर वेदांत कंपनीने याबाबतचं स्पष्टीकरण दिलं आहे.

महाराष्ट्र राज्याने या प्रकल्पासाठी भरपूर प्रयत्न केले, परंतू गुजरात सरकारने आमच्या आपेक्षा पूर्ण केल्या असल्याने आम्ही हा प्रकल्प गुजरातमध्ये करत असल्याचं, अनिल अग्रवाल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्याचप्रमाणे गुजरात मधला प्रकल्प पुढे नेण्यासाठी महाराष्ट्र गुरूकिल्ली असणार असल्याचंही अनिल अग्रवाल यांनी म्हटलं आहे.

तसेच,आमची सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले ग्लास उत्पादनातील गुंतवणूक देशभरातील उद्योगांची इकोसिस्टम तयार करणार असल्याचंही अनिल अग्रवाल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. अनिल अग्रवाल यांच्या या माहितीमुळे राज्यातील राजकीय वातावरण थोडं तरी निवाळेल असं दिसून येतं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!