मुंबई : वेदांता प्रकल्पाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी एक माहिती मोठी घोषणा केली आहे. ते म्हणाले की, आम्ही लवकरच वेदांता-फॉक्सकॉनचा संलग्न प्रकल्प महाराष्ट्र उभारणार आहोत. त्यांनी दिलेल्या माहितीमुळे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनिल अग्रवाल यांचे आभार मानले आहेत. याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणाही साधला आहे. विशेष करून त्यांनी शिवसेना पक्षाला लक्ष्य केलं असल्याचं दिसून येतं आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?
1 लाख 66 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीवरुन शिवसेना पक्षाने देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला केला होता. त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी चांगलंच फटकारलं असल्याचं दिसून येतं आहे. अस्वस्थता आणि नकारात्मकतेवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी स्वतः कार्यक्षम होण्यावर आधी लक्ष केंद्रित करा, असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षाला दिला आहे.
फडणवीस यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवर एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी अनिल अग्रवाल यांनी केलेल्या घोषनेबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटमध्ये लिहिले की, वेदांता-फॉक्सकॉनच्या संलग्न प्रकल्पासाठी महाराष्ट्राची निवड करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. तसेच पुढे देवेंद्र फडणवीस असंही म्हणाले की, महाराष्ट्रात गुंतवणूक यावी यासाठी आम्ही कायमच स्पर्धात्मक आणि व्यवसायपूरक राहू.
दरम्यान, अनिल अग्रवाल यांनी आम्ही महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास कटिबद्ध आहोत. आम्ही लवकरच एक हब तयार करू जिथे महाराष्ट्र आमच्या फॉरवर्ड इंटिग्रेशनचा भाग असणार असल्याचं म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Devendra Fadnavis | अनिल अग्रवाल यांच्या ‘त्या’ घोषणेनंतर देवेंद्र फडणवीसांनी मानले आभार म्हणाले…
- Breaking | ‘वेदांता फॉक्सकॉनं’ महाराष्ट्रात लवकरच करणार गुतंवणूक – अध्यक्ष अनिल अग्रवाल
- Vinayak Raut | “शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची यांची लायकी नाही”
- Shivsena। तरुणांनी उद्योगमंत्र्यांचा राजीनामा मागितला पाहिजे; वरुण देसाई आक्रमक
- Shivsena। “…तर संपूर्ण शिवाजी पार्क मैदान कुदळ फावड्याने उखडून टाकू”; शिवसेनेची शिंदे गटाला थेट धमकी


