🕒 1 min read
नागपूर : नागपूरचा पुढचा महापौर शिवसेनेचाच असेल असा हुंकार नागपुरात संजय राऊत यांनी शिवसैनिकांना दिला. दक्षिण नागपूर येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. “शिवसेनाला संपविण्याची ताकत कोनातही नाही. शिवसेनेला संपविणारा जन्माला यायचा आहे. नागपुरातले कितीही मोठे नेते येऊ द्या, त्यांना आता पुढील २५ वर्षे विरोधी पक्षातच राहायचं आहे. त्यामुळे नागपूर महानगरपालिकेसाठी तुम्ही आतापासूनच कामाला लागा. घराघरात पोहचा आणि सांगा यापुढचा नागपूरचा महापौर शिवसेनेचाच असेल.” असा हुंकार नागपुरात संजय राऊत यांनी शिवसैनिकांना दिला.
संजय राऊत म्हणाले, “आता इथल्या थापा खूप झाल्या, आता फसवणूक होऊ देणार नाही. महिला आघाडीला रणरागिणी म्हणतात. त्या आता नागपूर महानगर पालिकेच्या भ्रष्ट्राचाराविरोधात उतरणार. मग त्यांना कळेल शिवसेना काय आहे. जे स्वतःला नागपूरकर म्हणतात, ते आता मंबईकर झाले आहेत त्यांची संपत्ती मुंबईत आहे. नागपूरला वाऱ्यावर सोडलं.
नागपूर मनपात शिवसेनेचा वाघ येणार :
संजय राऊत म्हणाले, “आता यांच्यावर ईडी लावायला पाहिजे. हे आमच्यावर ईडी लावतात. असा राऊत यांनी भाजप नेत्यांना टोला लगावला. महापालिकेमधील घोट्याळ्यामुळे अनेकजण जेलमध्ये जातील. शिवसेना बेडर संघटना आहे. कोणाच्या बापाला घाबरत नाही. कोणाच्या पाठीमागून वार करत नाही. नागपूर मनपावर भगवा फडकेल, तेव्हा बाळासाहेब वरून पुष्पवृष्टी करतील. आजही नागपुरात कोण आला रे आला ही गर्जना घुमते. नागपूर महापालिकेवर शिवसेनेचा वाघ येणार आहे.”
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
