राणा दांपत्याच्या ‘त्या’ आव्हानाला बच्चू कडूंचे प्रत्युत्तर; म्हणाले, “वाघाची नखं अजूनही…”

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या मशिदीसमोर हनुमान चालीसा लावण्याच्या भूमिकेला खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी समर्थन केले आहे. त्यातच राणा दांपत्यानी येत्या २३ तारखेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या   मातोश्री  निवासस्थानी हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिला आहे. यावरच आता राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

“हा अतिशय मूर्खपणा आहे. कोणते मुद्दे घ्यावेत याचे भान राणांना राहिलेलं दिसत नाही. प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी हा  प्रकार सुरु आहे. सामान्य माणसाशी संबंध नसलेले मुद्दे घेऊन आपला अपमान कऱण्याच्या दृष्टीने ते जात आहेत.  निवडून येताना राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला आणि आता वेगळ्या विचारधारेचा पाठिंबा घेत आहेत. ही मतदारासोबत फार मोठी बेईमानी असून शिवसेनेच्या, उद्धव ठाकरेंच्या वाटेला गेलात तर काय होईल सांगता येणार नाही. कारण वाघाची नखं अजूनही धारदार आहेत.”, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.

दरम्यान राणा दांपत्याला अमरावतीमध्ये अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न असून राणा दांपत्य अमरावतीत नसल्याने ते रात्रीच मुंबईला निघून गेले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आता राणा दांपत्य सध्या कुठे आहेत, याचा पत्ता कुणालाच नाहीये.

महत्वाच्या बातम्या: