“राज ठाकरेंच्या सभेला पैसे देऊन लोक आणावे लागतील”; चंद्रकांत खैरेंचा खोचक टोला

औरंगाबाद : शिवसेनेच्या सभा मेळाव्यांना येण्यासाठी लोकांना कधीही पैसे देण्याची गरज पडली नाही. लोक स्वतःहून सभेला यायचे पण मनसेच्या मागील मेळाव्यातही ३०० रुपये देऊन लोकांना बोलवावे लागले. असा आरोप शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी राज ठाकरेंच्या सभेवर केला आहे.

१ मे रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला एक लाखाहून अधिक लोक जमतील, असा दावा मनसेतर्फे करण्यात आला आहे. आतापासून मराठवाड्यातील विविध संघटनांचे लोक मनसेच्या संपर्कात असून ते सभेला येण्याची तयारी करत आहेत, अशी माहिती मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. पण शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी हे डावे फोल असल्याचा आरोप केला आहे.

राज ठाकरेंची सभा औरंगाबाद मधील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर होणार आहे. या सभेत राज ठाकरे यांच्या सभेला पैसे देऊन लोक बोलवावे लागतील असा अंदाज चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला आहे. मनसेच्या मागील मेळाव्यातही ३०० रुपये देऊन लोकांना बोलवावे लागले असा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. तसेच खैरे यांना मिडीयाने राज ठाकरे यांच्या आगामी सभेच्या वेळी लोकांना विचारले तर लोकच सांगतील असा दावाही खैरे यांनी केला आहे. राज ठाकरेंनी ३ मे पर्यंत राज्यातील मशिदींवरील भोंगे हटवण्यात यावे असा इशारा दिला आहे. तसेच येत्या ३ मे रोजी रमजान ईद आहे, त्यामुळे या पाश्वर्भूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव राज ठाकरेंची सभा ३ मे नंतर घेण्यात यावी अशी विनंती पोलिसांकडून करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या –